पत्रकार बांधवावर गुन्हा दाखल झाल्याबद्दल, समस्त पत्रकारांचे शिक्रापूर पोलिसांना निवेदन…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिक्रापूर : 25/06/2021.

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे, दोन दिवसांपूर्वी वीज वितरणचे कर्मचारी व एका हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दाम्पत्य, यांच्यात हॉस्पिटलच्या वीजबीलासंदर्भात बाचाबाची होऊन, त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले होते. त्यावेळी हॉस्पिटलचे कर्मचारी तेथे उपस्थित होते. त्यात या हॉस्पिटलचे कर्मचारी असणारे पत्रकार विनायक साबळे यांचाही समावेश होता. या हाणामारीच्या प्रकारामुळे विजवीतरण कर्मचाऱ्यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. यात पत्रकार विनायक साबळे यांचेही नाव टाकले गेले. परंतु, तेथे उपस्थित असूनही काही व्यक्तींची नावे न आल्याने, आश्चर्य व्यक्त केले जात असून, सूडबुद्धीने हा प्रकार झालाय की काय ? अशी शंका सर्व पत्रकार बांधवांना आल्याने, त्या संदर्भात शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, यांना शुक्रवार दि. 25 जून 2021 रोजी, सर्व पत्रकार संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आलेय.

तसेच, हॉस्पिटलचे सी सी कॅमेरा फुटेज पाहून, या संदर्भात न्याय्य भूमिका घेण्याची मागणी यावेळी सर्व पत्रकार बांधवांनी केली.

यावेळी या निवेदनावर प्रतिक्रिया देताना पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी स्पष्ट केले की, “आम्ही घटना स्थळाचे सर्व व्हिडिओ क्लिप व सी सी कॅमेरा फुटेज तपासून, नेमके खरे काय व खोटे काय हे निष्पन्न करु.”

Advertise

यावेळी, सर्व पत्रकार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यात पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र चे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र खुडे, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भंडारे, शिरूर तालुका कार्याध्यक्ष शंकर पाबळे, पुणे शहराध्यक्ष अनिल खुडे, जिल्हा संपर्क प्रमुख उदयकांत ब्राम्हणे, त्याचप्रमाणे NUJM चे तालुकाध्यक्ष सचिन धुमाळ, तालुका समन्वयक प्रमोल कुसेकर व प्रमोद लांडे तसेच, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश वांढेकर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष जालिंदर आदक, उपाध्यक्ष सुनिल पिंगळे, विशाल वर्पे, सूर्यकांत शिर्के, तसेच जेष्ठ पत्रकार के डी गव्हाणे व पत्रकार सतीश केदारी आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *