अंगावर वीज पडुन पिंपळगाव खडकी ता. आंबेगाव येथील १९ वर्षीय मुलीचा दुदैवी मृत्यु.

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
८ ऑक्टोबर २०२१

आंबेगाव

Mira Sakharam Lohkare
मिरा सखाराम लोहकरे

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव तर्फे खडकी येथे मिरा सखाराम लोहकरे ( वय -१९ वर्ष ) या मुलीचा वीज पडून दुदैवी मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे.

आज आंबेगाव तालुक्यात सायंकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार मुसळधार पाऊस झाला त्यावेळी ही तरुणी कॉलेज वरून घरी येत असताना तिच्या अंगावर वीज पडल्याचे सांगण्यात येत आहे.

सदर घटने मध्ये श्री.सखाराम लिंबाजी लोहकरे यांना ही भाजलेले आहे. मयत मुलीस मंचर उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे शवविच्छेदनसाठी आणण्यात आले आहे.घटनेची माहीती कळताच मा तहसीलदार मॅडम समक्ष रुग्णालयात हजर असून पुढील शासकीय कार्यवाही सुरू आहे.

Pimpalgaon Khadki Ta. A 19-year-old girl from Ambegaon died tragically.
अंगावर वीज पडुन पिंपळगाव खडकी ता. आंबेगाव येथील १९ वर्षीय मुलीचा दुदैवी मृत्यु.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *