राजश्री भागवत यांना युवा कला गौरव पुरस्कार मिळाल्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते सत्कार

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
०२ ऑक्टोबर २०२१

नारोडी

Rajshri Nitin Bhagwat
राजश्री नितीन भागवत

नारोडी ता.आंबेगाव येथील सुप्रसिध्द रांगोळी कलाकार राजश्री नितीन भागवत यांची राज्यस्तरीय आर्ट बिट्स फौंडेशन पुणे या संस्थेकडून युवा कलागौरव पुरुस्कार २०२१ साठी निवड झाली असून महाराष्ट्र तसेच इतर राज्यात त्यांनी रांगोळी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत तसेच अनेक रेकॉर्ड आपल्या नावे त्यांनी केले आहे.याची दखल घेऊन त्यांना हा पुरूस्कार जाहीर झाला या वेळी खासदार डॉ अमोल कोल्हे यांचा आज नारोडी गावभेट दौरा होता. आर्ट बिट्स संस्थेकडून प्रदान करण्यात आलेल्या कला गौरव पुरूस्काराचे कौतुक म्हणून नारोडी ग्रामपंचायत कार्यालय येथे शिरूर लोकसभा मतदार संघाचे संसदरल खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या हस्ते सौ.राजश्री भागवत यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव तालुका अध्यक्ष विष्णू काका हिंगे कृषी उत्पन्न समिती मंचरचे चेअरमन देवदत्त निकम,भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील निलेश स्वामी थोरात,अंकित जाधव, सुहास बाणखेले, संतोष सैद, नवनाथ हुले ,तानाजी शेठ जंबुकर ,दिपक हुले आदि मान्यवार उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *