पद्मश्री पुरस्कार प्राप्त गिरीष प्रभुणे व बिजमाता राहीबाई पोपेरे यांचा कृतज्ञता सत्कार समारंभ संपन्न

पिंपरी-चिंचवड
४ डिसेंबर २०२१


आपला आवाज न्यूज नेटवर्क व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे आयोजन

भारत सरकार ने पिंपरी-चिंचवड येथील गुरूकुलम चे अध्यक्ष गिरीष प्रभुणे व नगर जिल्ह्य़ातील बिजमाता यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्याबद्दल कृतज्ञता सत्कार समारंभ व फेसबूक व इतर सोशल नेटवर्किंग च्या माध्यमातून महिलांना व्यावसाय व व व्यावसायाची संधी उपलब्ध करून देणा-या महिलांचा PCMC STAR AWARD 2021 हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांनी महिलांच्या सोशल मीडियावरील उल्लेखनीय कामाचे कौतुक करत महिलांनी संघटीत आणि सक्षम होणे ही काळाची गरज असल्याचे मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांना फेटे बांधून दीपप्रज्वलन करून पद्मश्री पुरस्कार प्राप्त गिरीष प्रभुणे बिजमाता राहीबाई पोपेरे यांचा कृतज्ञता सत्कार व ‘आई कुठे काय करते’ मालिका फेम रूपाली भोसले यांचा कला गौरव पुरस्कार 2021 देऊन राज्य संघटक संजय भोकरे पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया चे अध्यक्ष अतुल परदेशी, आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे यांनी सत्कार केला.यावेळी विभागीय संपादक रोहीत खर्गे उद्योजक दिलीप सोनिगरा, संजय भिसे अदि मान्यवर उपस्थित होते.

आपला आवाज न्यूज नेटवर्क व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अनेक वर्षांपासून पत्रकारीतेत सकारात्मक काम करीत असून पुरस्काराच्या माध्यमातून अनेकांच्या कार्याचे कौतुक करून त्याना प्रोत्साहित करत असल्याचे मत आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले. भारत सरकार ने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आणि आपला आवाज न्यूज नेटवर्क ने याची दखल घेऊन आज कृतज्ञता सत्कार केला. यामुळे च खरी आणि वास्तव पत्रकारिता अजूनही जिवंत आहे. असे मत मांडत आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या कार्याचे कौतुक पद्मश्री पुरस्कार प्राप्त गिरीष प्रभुणे यांनी केले.

महिलांनी संघटित आणि सक्षम होणे काळाची गरज-संजय भोकरे

माझी नाळ ही मातीशी जोडल्या गेली आहे म्हणून मी बीज संकल्न केले आणि करत राहणार आहे. माझ्या सोबत माझ्या ह्या कार्यात असंख्य महिला जोडल्या गेल्या आहेत. आजवर अनेक पुरस्कार मिळाले याचा आनंद आहे. पुरस्कार हे कामातून मिळतच असतात म्हणून हुरळून न जाता जमीनीवर राहून काम करत असते. आज ज्या महिलांना याठिकाणी PCMC STAR AWARD 2021 देऊन सन्मानित करण्यात आले त्या बद्दल मला खूप आनंद होत आहे.महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे आणि तो आज आपला आवाज न्यूज नेटवर्क व आपला आवाज आपली सखी यांनी केला. त्याबद्दल पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहीबाई पोपेरे यानी कौतुक केले.

‘आई कुठे काय करते’ मालिका फेम रूपाली भोसले यांनी महिलांना सक्षम होण्यासाठी केवळ शिक्षणाची गरज नसून आत्मविश्वासाने प्रत्येक काम करत स्व:ताला सिद्ध केले पाहिजे. असे मनोगत व्यक्त करत माझेही शिक्षण केवळ नववी झाले आहे परंतु आज मी चांगला अभिनय करू शकते चांगली इंग्रजी भाषा बोलू शकते आणि केवळ मी काय आहे? मी काय करू शकते? हे मी माझ्यातले गुण ओळखू शकले. म्हणून आज मी इथे आहे. आपला आवाज न्यूज नेटवर्क व आपला आवाज आपली सखी यांनी आज सोशल नेटवर्किंगवर महिलांचे ज्या महिलांनी संघटन करून ग्रुप च्या माध्यमातून व्यावसाय उपलब्ध करून दिले त्यांचा सन्मान केला आहे. याचे निश्चित कौतुक केले पाहिजे असे मत अभिनेत्री रूपाली भोसले यांनी व्यक्त केले. या नंतर सेलिब्रेटी गप्पा टप्पा या कार्यक्रमात रूपाली भोसले (संजना) हिला आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे आणि उपस्थित प्रेक्षकांनी प्रश्न विचारले त्यावर रूपालीने मनमोकळे उत्तर देत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शोभा कुलकर्णी यांनी केले तर आभार विभागीय संपादक रोहित खर्गे यांनी मानले.या कार्यक्रमाचे फोरम पार्टनर होते आपला आवाज आपली सखी तर रेडीओ पार्टनर होते FM बोलेतो 91.1 रेडीओ सीटी सहप्रायोजक होते कोहिनूर ग्रुप पुणे व सोन सखी वन ग्रॅम ज्वेलरी.

संजय भोकरे – राज्य संघटक, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ
पद्मश्री पुरस्कार प्राप्त गिरीष प्रभुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *