घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण व कोरोना योद्धा सन्मान पुरस्कार मनसेचे गणेश सातपुते यांच्या हस्ते पार

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१ ऑक्टोबर २०२१

पिंपरी चिंचवड

Commendable activities of Akash Landage and Anita Panchal
आकाश लांडगे व अनिता पांचाळ यांचा स्तुत्य उपक्रम

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्र.२१ व २२ मधील नागरिकांसाठी श्री. गणेश महोत्सव स्पर्धा २०२१ आयोजित करण्यात आल्या होत्या, या कार्यक्रमामध्ये घरगुती गणपती सजावट, गौरी गणपती सजावट, रांगोळी स्पर्धा, महेंदी स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ व कोरोना महामारी चा संसर्ग असताना ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली म्हणजेच डॉक्टर, पत्रकार, महावितरणचे कर्मचारी, सफाई कामगार, आशा वर्कर, कीटकनाशक धूर फवारणी घरगुती गैस वितरक करणारे कर्मचारी व पोलिस मित्र संघटनेचे कर्मचारी यांचा स्तकार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी विधानसभेचे उपविभाग अध्यक्ष आकाश लांडगे, महिला उपशहरध्यक्षा अनिता पांचाळ, बालाजी पांचाळ, वैशाली बोत्रे, रोहीत थरकुडे, किरण वाघेरे, अक्षय सोरटे, आकाश पांचाळ यांनी केले होते. बक्षिस वितरण समारंभाच्या वेळेस महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गणेश सातपुते, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष/नगरसेवक सचिन चिखले, मनसेच्या प्रथम महिला नगरसेविका आश्विनी चिखले व महिलाशहर शहाराध्यक्षा अश्विनी बांगर व पिंपरी चिंचवड मधील मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गणेश सातपुते म्हणाले की, कोरोणा आजुन पूर्णपणे संपलेला नाहीये नागरिकांनी जागृत राहिले पाहिजे घरच्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे रोज मास्क व सेनिटिजायरचा वापर हा झालाच पाहिजे. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते हे तुमच्यासाठी अहोरात्र काम करत असतात त्यांना ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाठिंबा द्यावा ही इच्छा व्यक्त केली, आयोजक पिंपरी विधानसभेचे उपविभाग अध्यक्ष आकाश लांडगे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार हे कोरोनाच्या नावाखाली रोज नविन नियमावली आणने, हिंदुच्या सणांवरती निर्बंध लावणे, दहिहंडी होऊ न देने यामध्ये लोकांचे मानसिक खच्ची करण होत आहे. अशा प्रकाराला थांबवण्यासाठी व लोकांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आम्ही श्री.गणेश महोत्सव स्पर्धेचे आयोजन केले,जेणे करून नागरिकांनी उत्साहात आपले सण साजरे केले पाहिजेत. त्यानंतर विजेते झालेले तरुण मुले, मुली, महिलांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच सहभागी झालेल्या असंख्य नागरिकांना प्रशस्तीपत्रक व भेटवस्तु देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *