पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीची १५ वी बैठक व वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. पत्रकार परिषद सुरू असताना आयुक्त राजेश पाटील यांचा काढता पाय

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१ ऑक्टोबर २०२१

पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड संचालक मंडळाची पंधरावी बैठक आणि वार्षीक सर्वसाधारण सभा आज गुरुवार , दि. ३० / ०१ / २०२१ रोजी दुपारी १२.०० वा , पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कार्यालय , ऑटोक्लस्टर चिंचवड -१९ येथे आयोजीत करण्यात आली होती. कंपनीचे चेअरमन तथा अतिरीक्त मुख्य सचिव श्री. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी, मा. महापौर तथा संचालक श्रीम. उषा उर्फ माई ढोरे , मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त श्री. राजेश पाटील , सत्तारुढ पक्षनेता तथा संचालक श्री . नामदेव ढाके , विरोधी पक्षनेता तथा संचालक श्री. राजू मिसाळ, विभागीय आयुक्त श्री . सौरभ राव , मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पोलीस आयुक्त श्री. कृष्ण प्रकाश , पीएमपीएलएम अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा, सचिव ममता बात्रा , संचालक सचिन चिखले , सह मुख्य कार्यकारी अधिकारी ( एबीटी ) श्री. राजन पाटील, सह मुख्य कार्यकारी अधिकारी ( पॅन सिटी ) श्री . निळकंठ पोमण , मुख्य वित्तीय अधिकारी श्री . सुनिल भोसले , कंपनी सचिव चित्रा पंवार, सह शहर अभियंता अशोक भालकर आदी उपस्थित होते. सदर बैठकीत कार्यक्रम पत्रिकेवरील एकुण २६ विषयांपैकी यातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करुन निर्णय घेणेत आले. यामध्ये, माजी अध्यक्ष श्री. राजेंद्र जगताप , PMPML यांच्या जागी श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पीएमपीएमएलचे अध्यक्ष म्हणून नव्याने नियुक्ती झालेली असून PCSCL चे अधिकृत संचालक म्हणून त्यांच्या नावाला मंजूरी देण्यात आली .

पत्रकार परिषद सुरू असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर न देताच पत्रकार परिषद आटोपती घेऊन आयुक्तांनी काढता पाय घेतला. आयुक्तांना प्रश्न विचारल्यावर राग येतो हे पुन्हा एकदा पत्रकारांना पाहायला मिळाले.

स्मार्ट सिटी मध्ये नव्याने नियुक्त केलेल्या स्वयंम अस्वार म्हणजे “चहा पेक्षा किटली गरम ” याचा प्रत्यय पत्रकारांना आला.

३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी संचालक मंडळाच्या अहवालास मंजूरी देण्यात आली.

आर्थिक वर्ष २०२१-२०२२ पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळ यांच्या मंजुरीच्या अधीन राहून कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षक म्हणून में एमकेजीएन अँड असोसिएट्स , चार्टर्ड अकाउंटंट यांची नियुक्तीबाबत चर्चा करून मान्यता देण्यात आली.

आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाच्या मान्यतेला अधीन राहून मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष माननिय श्री . प्रदीप कुमार भार्गव यांची तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्तीबाबत चर्चा करून त्यांच्या नावास मान्यता देण्यात आली. श्री . भार्गव हे सध्या इतर सहा कंपन्यांमध्ये महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत.

तसेच , आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाच्या मान्यतेला अधीन राहून माननिय श्री. यशवंत श्रीपाद भावे यांची तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्तीबाबत चर्चा करून मंजूरी देण्यात आली. श्री. भावे हे माजी अध्यक्ष गर्व्हमेंट ऑफ इंडिया , माजी नेत्ररमन एजर इकॉनॉमिक रेग्युरेटरी ऑपॉरीटी ऑफ इंडिया आणि सध्या उपाध्यक्ष असोसिएशन ऑफ एडोलोसेंट अँड चाईल्ड केअर इन इंडिया यासह इतर चार कंपन्यांची त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी आहे .

कंपनी अधिनियम , २०१३ कलम १७७ अंतर्गत लेखापरीक्षण समितीच्या स्थापनेवर चर्चा होवून मंजूरी देण्यात आली .

कंपनी अधिनियम , २०१३ च्या कलम १७८ अंतर्गत नामांकन आणि मोबदला समितीच्या घटनेवर चर्चा करून मान्यता देण्यात आली .

सीएमआर समितीमध्ये इच्छुक संचालकाच्या नियुक्तीबाबत चर्चा करण्यात आली .

स्मार्ट सिटी प्रोजेक्ट्स ( RFP2 आणि RFP3 ) च्या वेगळ्या निविदा प्रक्रियेद्वारे ” विविध स्मार्ट घटकांना वीज पुरवठा करण्यासाठी विद्युत पायाभूत सुविधा ” ” इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर ” तयार करण्यासाठी र.रु. १.७३ कोटी खर्चाबाबत चर्चा करण्यात आली .

– मे . टेक महिंद्रा कंपनीच्या विनंतीनुसार , त्यांनी नमूद केलेले बदलाबाबत १४ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयावर चर्चा करून मुळ निविदेतील अटी व करारनाम्यानुसार गुणवत्तेबाबत कोणताही बदल न करणेचा निर्णय घेणेत आला.

मे . KPMG सल्लागार यांची फक्त GIS Enable ERP चे कामकाजासाठी पुर्णवेळ ५ व २ तज्ज्ञ सल्लागार नेमणुकीबाबत निर्णय घेण्यात आला .

पिंपरी – चिंचवड शहरातील इंडिया सायकल 4 चेंज चलेंजसाठी टेनिकल कन्सल्टंट / एनएमटी एक्सपर्टची नेमणूक आणि र.रु .२० लाख देयकांबाबत चर्चा करून मान्यता देण्यात आली .

देवकर पार्क ते सांगवी एसटीपी पर्यंत वाढलेल्या इंटरसेप्टर सीवर लाईनबाबत चर्चा करून मंजूरी देण्यात आली .

केंद्र शासनाच्या Cycle 4 Chalenge स्पर्धेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सहभाग घेतलेला असू , त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहराची पहिल्या फेरीमध्ये पहिल्या अकरा शहरांमध्ये निवड झाली आहे. सदर स्पर्धेमध्ये र.रु. १ कोटीचे बक्षिस प्राप्त झालेले आहेत . सदर स्पर्धेदरम्यान नागरिकांना सांगवी फाटा ते काळेवाडी फाटा या रस्त्यास प्रथम पसंती दिल्याने अंतिम निकालापूर्वी सदर रस्त्यावर सायकल ट्रॅक व पदपथ विकसित करणे आवश्यक आहे . सदरचे काम मर्यादीत कालावधीमध्ये पूर्ण करावयाचे असल्याने सदरचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत ABD कार्यक्षेत्रात चालू असलेल्या निविदेतील बचतीमधून करण्यास मान्यता देण्यात आली आहे . यासाठीचा लागणारा निधी र.रु. ४० कोटी महापालिकेमार्फत स्मार्ट सिटीकडे वर्ग केला जाणार आहे . या ऐनवेळच्या विषयाला बैठकीत मान्यता देण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *