पिपंळगाव जोगा धरणाच्या डाव्या कालव्यास झाडाझुडपांचा विळखा

कैलास बोडके
प्रतिनिधी 
१ ऑक्टोबर २०२१

पिंपळगाव

पिंपळगावजोगा धरणाच्या डाव्या कालव्याला झाडाझुडपांचा विळखा. शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या या कालव्याला सध्या जंगलाचे स्वरूप आले आहे.

जुन्नरचा पुर्व पट्टा आणि नगर जिल्ह्यातील पारनेर, आळकुटी, आदि भागासह जुन्नरच्या बेल्हे, राजुरी, आळे, वडगाव आनंद, पिंपरी पेंढार, उंब्रज, काळवाडी, आदि गावांना या कालव्याच्या पाण्याने एक नवजीवनच मिळाले आहे. अशा या कालव्याच्या दोन्ही बाजूंनी अगदी कॅनॉलच्या अस्तरिकरणास मोठंमोठी बाभळीची झाडे झाली आहेत. तसेच पाटबंधाऱ्यात दगडगोट्यांसह झाडेझुडपे इतरही घाण पसरली आहे या झाडांच्या मुळांनी अनेक ठिकाणी अस्तरीकरणास भेगा पडलेल्या आहेत. भविष्यात याच झाडाझुडपंच्या मुळांनी पाटबंधाऱ्याला तडे जाऊन फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशा या जुन्नर तालुक्याच्या पुर्व पट्ट्यास वरदान ठरलेल्या या पाटबंधाऱ्यातील उंब्रज, पिंपरी पेंढार, वाळुंजवाडी आदि परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढलेली आहेत त्यामुळे बिबटयाचा वावर वाढला आहे, त्याचप्रमाणे मोठया प्रमाणात कचरा, झुडपे, गवत यामुळे भविष्यात पाणी जाण्यास अडथळा निर्माण होणार आहे.

कुकडी पाटबंधारे विभागाने यावर त्वरित कार्यवाही करून स्वच्छता करावी जेणेकरून भविष्यात कॅनॉलचे होणारे नुकसान टाळले जाईल, आणि कालव्याच्या बाजुला असणाऱ्या शेतकऱ्यांचे बिबटयापासुन सरक्षण होईल अशी मागणी शेतकरी बांधव करत आहे.
फोटो – पिंपळगाव जोगा धरण डावा कालव्याच्या पिंपरी पेंढार येथे पाटबंधाऱ्यात वाढलेली मोठमोठी बाभळीची झाडे, कचरा, दगडगोटे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *