सह्याद्री ग्रुपच्या सूर्य हॉस्पिटलमधील कोरोना योद्ध्यांच्या वेतनात भरघोस वाढ; कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या चर्चेला यश

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१७ सप्टेंबर २०२१

पुणे

कोरोना योद्ध्यांच्या वेतनात १० हजार रुपयांनी भरघोस वाढ झाली

पुण्यातील शनिवारवाडा कसबा पेठ येथील सह्याद्री ग्रुपच्या सूर्य हॉस्पिटलमधील कायम कर्मचा-यांच्या वेतनवाढीचा १ जानेवारी २१ पासून करार करण्यात आला. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटल व्यवस्थापनाशी हा करार झाला. त्यामुळे दोन वर्षांपासून कोरोना काळात काम करणा-या कोरोना योद्ध्यांच्या वेतनात १० हजार रुपयांनी भरघोस वाढ झाली.

मागील ८ महिन्यांचा वेतनवाढीचा फरकही कर्मचा-यांच्या खात्यावर जमा

हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या वतीने सह्याद्री ग्रुपचे सल्लागार सदानंद बापट, डॉ .जयशिंग शिंदे यांनी तर कर्मचा-यांच्यावतीने यशवंतभाऊ भोसले, हॉस्पिटलमधील कामगार प्रतिनिधी गीता राजपुरे, चंदा पवार, किरण साकोरे, गणेश पवार, हर्षदा जाधव, जयवंत महागडे यांनी सहभाग घेतला. या करारामुळे १ जानेवारी २०२१ पासून पुढील ३ वर्षांकरिता पहिल्या पगारापासून एकाच टप्प्यात एकदम १० हजार रुपये थेटवाढ कर्मचा-यांच्या वेतनात मिळाली. तसेच मागील ८ महिन्यांचा वेतनवाढीचा फरकही कर्मचा-यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. यामुळे कर्मचा-यांच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता. भरघोस वेतनवाढ मिळाल्याने कोरोना योद्ध्यांनी यशवंतभाऊ भोसले आणि हॉस्पिटल व्यवस्थापनाचे आभार मानले.

”कोरोना महामारीच्या काळात या योद्ध्यांनी जीवावर उदार होऊन काम केले. आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. या कोरोना योद्ध्यांना भरघोस वेतनवाढ दिल्याबद्दल हॉस्पिटल व्यवस्थापनाचे आम्ही आभारी आहोत”, असे कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *