श्रीक्षेत्र ओझर येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२५ जानेवारी २०२२

ओझर


श्री क्षेत्र ओझर येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करून, प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.साहेबांच्या प्रतिमेचे पूजन युवा सेनेचे राज्य विस्तारक व श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेशभाऊ कवडे व ओझर गावच्या सरपंच तारामती कर्डक यांनी केले. या कार्यक्रमावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली व साहेबांना आदरांजली वाहिली.

बाळासाहेबांचे विचार व त्यांनी मराठी माणसांचे संघटन उभे करून नोकरी, व्यवसायासाठी तरूणांना दिलेले प्रोत्साहन व त्यासाठी केलेला संघर्ष आजच्या नव्या पिढीपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री विघ्नहर विद्यालयाचे शिक्षक श्री सगर सर यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुंदर चित्र रेखाटले होते.


सदर कार्यक्रमासाठी श्री विघ्नहर देवस्थानचे सचिव दशरथ मांडे, खजिनदार कैलास घेगडे, विश्वस्त रंगनाथ रवळे, आनंदराव मांडे, मंगेश मांडे, ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष शहाजी रवळे, ग्रामपंचायत सदस्य मोहन कवडे, मिरा जगदाळे, वर्षा मांडे, मुख्याध्यापक राऊत सर, सगर सर, अश्वमेघ युवा मंचचे उपाध्यक्ष योगेश शिंदे ग्रामपंचायत सदस्य संदीप घाईतडके ग्रामस्थ सुयोग कवडे, राजेश कवडे, विनायक रोकडे, ओमकार पंडित तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *