सेवादीप संस्थेमुळे विद्यांगन शाळेतील भिंती बोलक्या

भानुदास हिवराळे
बातमी प्रतिनिधी

१९ डिसेंबर २०२२

पिंपरी चिंचवड


चित्रकलेचा विद्यार्थ्यांच्या जीवनात अमूल्य असा वाटा आहे. शालेय जीवनापासून सर्जनशीलतेचा विकास साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी रंगाच्या सानिध्यात वावरायला हवे. तेव्हाच त्यांचा सर्वांगीण विकास शक्य आहे. हे मर्म पुण्यातील सेवादीप संस्थेने जाणून वॉल ब्युटीफिकेशन हा उपक्रम सुरू केला आहे. सेवादीप ही संस्था विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करत आहे.

पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवड येथील ओम प्रतिष्ठान संचलित विद्यांगन हायस्कूल शाळेतही ही ऍक्टिव्हिटी राबवण्यात आली. सेवादीप संस्थेच्या उत्कृष्ट अशा नियोजनाने पन्नास स्वयंसेवक या उपक्रमात जोडले गेले. पालक, विद्यार्थी, शिक्षक, विविध संघटना या सर्वांनी मिळून शाळेच्या भिंतीवर सुरेख असे पेंटिंग केले. स्वयंसेवकांच्या समर्पित वृत्तीने आणि सेवादीपच्या अथक मेहनतीने शाळेच्या सर्व भिंती अतिशय बोलक्या आणि सुंदर झाल्या.

मुलांना शाळेचे बदललेले स्वरूप पाहून अतिशय आनंद झाला. ‘सेवादीप संस्था या सामाजिक व्यासपीठाच्या माध्यमातून आणि पिंपरी चिंचवड येथील अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शाळेमध्ये अशा ऍक्टिव्हिटी राबवण्यासाठी प्रयत्नशील राहावे हा विचार ओमप्रतिष्ठांच्या अध्यक्षा वनिता सावंत यांनी मांडला’.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *