जिल्हा क्रीडा संकुल बारामती (पुणे) येथे अॅमच्युअर स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र आयोजित राज्यस्तरीय किकबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा दिनांक 29 ते 30 जुन 2023 रोजी यशस्वी आयोजन संपन्न झाले.
या स्पर्धेत महाराष्ट्रातुन सर्व वयोगटात सुमारे 550 खेळाडूं ,पंच व कोच यांनी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेचे उदघाटन समारंभ दिनांक 30 जुन रोजी 11वाजता संपन्न झाला या स्पर्धेचे उदघाटन निवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.राजेशकुमार बागुल, तालुका क्रीडा अधिकारी बारामती श्री महेश चावले.तसेच अॅमच्युअर स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र चे अध्यक्ष श्री संतोष म्हात्रे उपाधक्ष्य श्री.मंदार पणवेलकर श्री संतोष खंदारे उपाध्यक्ष व जाॅईंड सेक्रेटरी श्री विकास बडदे, महाराष्ट्र कराटे असो चे ग्रामीण पुणे जिल्हा सचिव श्री रविंद्र करळे, अभिमन्यू इंगळे सचिव बारामती कराटे असोसिएशन यांच्या उपस्थित संपन्न झाला.
स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी माजी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री राजेश बागुल यांनी खेळा मुळे खेळाडूंचा सर्वांगीण विकास होतो,तसेच किक बॉक्सिंग या खेळामुळे मुले मुली आपले स्वतःचे स्व :रक्षण करू शकतात ,आज ती या काळाची गरज आहे.
या राज्यस्पर्धेत यश मिळविणाऱ्या खेळाडूंना शासन योजनांचे ही लाभ मिळणार आहेत.असे ते म्हणाले.
राज्य संघटनेचे अध्यक्ष श्री संतोष म्हात्रे यांनी त्यांचे भाषणात किक बॉक्सिंग संघटणा जिल्हा ते आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी वाटचाल करीत असुन खेळाडूंना या खेळाचे सर्वच लाभ कसे लाभतील याचा प्रयत्न करीत असुन या संघटणे मार्फत राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य खेळाडूंसाठी विविध लाभ मिळवुन देण्याचाही प्रयत्न करीत असल्याचे म्हणाले.
या स्पर्धेचे सर्व साधारण विजेतेपद रायगड जिल्हाने पटकाविले उपविजेतेपद पुणे जिल्ह्याने फटकावले तर तृतीय क्रमांक मुंबई जिल्ह्याने मिळवले स्पर्धेचे टेक्निकल डायरेक्टर म्हणून संतोष खंदारे यांनी काम पाहिले तर ततामी इन्चार्ज म्हणून महेंद्र राजे रवींद्र(पप्पू)म्हात्रे विकास बडदे यांनी काम पाहिले
स्पर्धेचे प्रास्ताविक श्री मंदार पणवेलकर यांनी केले व समारोप व आभार श्री संतोष खंदारे यांनी मानले.