दुर्मिळ अॅटलास माॅथ फुलपाखरू सहारा वृद्धाश्रमात विसावले. आंदर मावळात वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकारांना पर्वणी…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

कुसवली मावळ
दि- ११ सप्टेंबर २०२१
जगातील सर्वात मोठी किटक जात व पतंग वर्गात मोडणारा ॲटलास माॅथ ( फुलपाखरू) आंदर मावळात दिसून आल्याने वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकारांना आता संधी प्राप्त झाली आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला व निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असलेला परिसर म्हणून आंदर मावळ हा भाग ओळखला जातो.घनदाट झाडी,जंगल,धबधबे, तलाव, डॅम, धरण,याचबरोबर असंख्य प्रकारच्या वेली व वृक्षांमुळे वन्यजीव अभ्यासक, वनस्पती शास्त्राचा अभ्यास करणारे व निसर्ग वाचण्याची तसेच अनुभवण्याची आवड व छंद असलेल्या सर्वांची पाऊले आंदर मावळाकडे वळत असतात.


पावसाळयात तर या परिसराचे सौंदर्य अधिक खुलते.नुकतेच येथील कुसवली या गावात अॅटलास माॅथ हा फुलपाखरासारखा दिसणारा दूर्मिळ किटक आढळून आला. काडेपेटीच्या पोटात ज्याप्रमाणे काडया लपून असतात अगदी तसं डोंगरांच्या पोटात लपेटलेले व वनविभागाचा अंकुश असलेले हे छोटंसं गाव आहे.
या गावातच असलेल्या सहारा वृध्दाश्रमात ॲटलास माॅथ दृष्टीस पडला. समोरच असलेले घनदाट जंगल यामुळे या भागात या किटकाचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून अभ्यासकांना आता मोठी संधी निर्माण झाली आहे.
प्रसंग होता विजय जगताप यांनी वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अंदर मावळ मध्ये निसर्गाच्या सानिध्यात सहारा वृद्धाश्रम सुरू केला आहे तेथे विजय जगताप व मित्र परिवार संध्याकाळी गप्पा मारत असताना हे भव्य दुर्मिळ फुलपाखरू डोक्यावरून घिरट्या घालत होते. अगोदर वाटले की हा घुबडासारखा पक्षी असावा. आणि या पाहुण्यांचे वास्तव्य जवळपास या सहारा वृद्धाश्रमात जवळजवळ एक तास होते. पण हे फुलपाखरू आहे याची किंचितही कल्पना मनाला शिवली नाही असे जगताप यांनी सांगितले. जेव्हा त्याचे फोटो पाहिले तेव्हा मी विजय जगताप यांना सांगितले की हा वेगळाच पक्षी आहे आणि याचे संशोधन करू या. वन्यजीव अभ्यासकांना फोटो पाठवू आणि विचारू . अगदी कामी वेळेत माझा जवळचा मित्र झालेला विजय जगताप यांचा मुलगा अंशुल जगताप याने त्या पाहुण्याचे फोटो गुगलवर सर्च केले आणि एक नवल समोर आले आम्ही त्याच्याविषयी चर्चा करत होतो ते एक मोठे व दुर्मिळ फुलपाखरू असल्याचे समोर आले. आणि यासाठी अभ्यासक व फोटोग्राफर तासनतास प्रतीक्षेत असतात तेच दुर्मिळ अटॅलस मॉस फुलपाखरू सहारा वृद्धाश्रमात जवळजवळ एक तास पाहुणे म्हणून घिरट्या घालत होते पण याची पुसटशीही कल्पना विजय जगताप आणि मित्र मंडळींना नव्हती.

बोरिवली येथील संजय गांधी आंतरराष्ट्रीय उद्यान तसेच ठाणे जिल्ह्यातील आदिवासी परिसर असलेल्या मुरबाड येथे दहा वर्षांपूर्वी ॲटलास माॅथ आढळून आला होता.
साधारणपणे एक फुट रूंद व ७ इंच इतकी उंची असलेला हा प्रत्येकाला भूरळ घालणारा किटक एका जागी स्थिर झाल्यानंतर सेम फुलपाखरासारखा वाटतो. त्याच्या पंखांवर असणा-या असंख्य प्रकारच्या नक्षीदार रंगछटा इतक्या देखण्या व सुबक असतात की निसर्गाची ही देणं कोणालाही पाहत रहावीशी वाटते. फक्त रात्रीच बाहेर पडणारा ॲटलास माॅथ दिवसा मात्र झाडावर किंवा फांदीवर बसून असतो.याचे वैशिष्टय म्हणजे यास तोंड म्हणजेच इंद्रिय नसते. या किटकाचे पूर्णपणे पतंगात रूपांतर झाल्यानंतर फक्त १० ते १५ दिवसांचे यांचे आयुष्य असते.भले मोठे असणारे पंख व त्यांच्या फडफडीतून निघणारा आवाज श्रवणीय असतो.


सध्या किटकातील या जातीच्या नर व मादीच्या मिलनाचा काळ सुरू असून सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यापर्यंत ॲटलास माॅथ सर्वांना दिसू शकतो.
सहारा वृध्दाश्रमाचे संचालक विजय जगताप यांच्या दृष्टीस अॅटलास माॅथ पडल्यानंतर व अंशुल ने उकल केल्यानंतर त्याचे हे फोटो आपला आवाजच्या प्रेक्षकांसाठी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *