दुचाकी वाहने चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

जालना प्रतिनिधी गणेश जाधव
गेलेल्या दुचाकी वाहनांची छडा लावण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी चंदनझिरा पोलिसांना दिले होते पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले यांचे पथक चंदनझिरा हद्दीमध्ये गस्त घालत असताना त्यांना पाहून एक विना नंबरच्या दुचाकी चालक थांबण्याचा इशारा केला असता, तो पळून जात होता शेख आदिल शेख सिद्धीकी (रा. औरंगाबाद) यास पोलिसांनी पाठलाग करून पकडले दुचाकीच्या मालकी हक्क व पळून जाण्याबाबत विचारपूस करता त्याने ती दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली यावेळी त्याचा दुसरा साथीदार सय्यद मोमीन सय्यद लाल (वय 24) यास सुंदरनगर येथून ताब्यात घेण्यात आले या दोघांनीही बुलढाणा जिल्ह्यात सासुरवाडीत लपवून ठेवलेल्या व स्वतःच्या ताब्यात असलेल्या चोरीच्या पाच दुचाकी काढून दिल्यात पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस कर्मचारी साई पवार, अनिल चव्हाण, अनिल काळे, यांची कामगिरी