आंबेगाव भूषण पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांची बैठक संपन्न

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
२१ मार्च २०२२

घोडेगाव


घोडेगाव येथील अमित गेस्ट हाऊस येथे सर्व पुरस्कारर्थीं साठी गेट टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दि.१४ एप्रील २०२२ रोजी घोडेगाव ता.आंबेगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ वी जयंती साजरी होणार असुन युगप्रर्वतक प्रतिष्ठाण महाराष्ट्रराज्य यांच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून राज्याचे गृहमंत्री मा.ना दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आंबेगाव – शिरूर लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे ,एन सी आर डी च्या सदस्या पूर्वाताई वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे.


या निमित्तानेच विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या अशा अनेक मान्यवरांना,गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते सन २०२१ -२२ चा आंबेगाव भुषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे या वेळी युगप्रवर्तक प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गौतम खरात यांनी सांगितले.


यावेळी दि.१४ एप्रील २०२२ रोजी पंचायत समिती कार्यालय घोडेगाव ता.आंबेगाव येथे कशा प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन असणार आहे या बाबत माहिती देण्यात आली. या वेळी सर्व आंबेगाव भूषण पुरस्कार जाहीर झालेले मानकरी उपस्थित होते.या वेळी युगप्रवर्तक प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात यांनी सर्व पुरस्कार्थांना आमंत्रण पत्रिका दिली तसेच गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. रामदास जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले शेवटी अभार अमित रोकडे यांनी.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *