पिंपरी ।
युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कर्नाटक मधील बागलकोट येथे पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने काढण्यात आला. या घटनेचा तीव्र निषेध आज करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सन्मानाने पुनरस्थापना करण्यात यावी. कर्नाटक मध्ये भाजपाचे सरकार असो, काँग्रेसचे सरकार असो ते महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, छत्रपती शिवरायांचा द्वेष करतात हे वारंवार सिद्ध झाले आहे. सीमावर्ती भागातील मराठी बांधवांवर वारंवार दडपशाही करून अन्याय अत्याचार करतात.हे जर थांबले नाही तर मात्र शिव, फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊंच्या महाराष्ट्राचा हिसका कर्नाटक मनोवृत्तीला दाखवा लागेल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी मानव कांबळे, मारुती भापकर, प्रकाश जाधव, गणेश भांडवलकर, साजन औसारमल,लहु लांडगे, आनंदा कुदळे, जितेंद्र छाबडा, नीरज कडू सचिन देसाई अशोक सातपुते अजित शेख ब्रह्मानंद जाधव नरेंद्र बनसोडे विशाल सरवदे श्रीपती पाटील दिगंबर बालुरे राजन नायर व अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.