बालकवींचे भव्य राज्यस्तरीय ‘अंकुरले काव्य’ या साहित्य संमेलनाचे शानदार आयोजन..!

ओझर प्रतिनिधी: मंगेश शेळके

दि.२ जून २०२१ (ओझर ) :अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे शाखा व तेजस्विनी महिला संस्था पुणे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारेगाव भिवर,ता.दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ऑनलाईन बाल कवींच्या कवितांचे भव्य राज्यस्तरीय आयोजन यशस्वीपणे पार पडले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व प्रसिद्ध चित्रपट निर्माते शरद गोरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राज्यभरातून सुमारे शंभरच्या वर बालकवींनी आपला सहभाग नोंदवला होता.यावेळी बालमनांच्या संवेदना व विचार त्यांच्या काव्यातून प्रकट होताना दिसले.या नव बालकवींच्या कवितांचा काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित करण्याचा संस्थेचा मानस आहे.
यावेळी या बालकाव्य साहित्य संमेलनाचे सूत्र संचालन सौ.संगिता लंघे मॅडम,मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारेगाव भिवर, ता.दौंड यांनी केले.
या ऑनलाईन बालकाव्य साहित्य संमेलनाच्या निमित्ताने डॉ.अलकाताई नाईक,कोकण प्रदेश उपाध्यक्ष-अ. भा.म.सा.प.पुणे व जेष्ठ सल्लागार तेजस्विनी महिला संस्था, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तर शुभांगी ताई काळभोर, राष्ट्रीय उपाध्यक्षा अ. भा.म.सा.प.पुणे व अध्यक्ष तेजस्विनी महिला संस्था पुणे, यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी कवी पत्रकार राजेंद्रकुमार शेळके सर,शरद गोरे सर,राष्ट्रीय कार्याध्यक्ष अ.भा.म.सा.प.पुणे, सौ.जयश्री नांदे, नवनाथ वनवे , संपत सटाले,
विजयकुमार पवार,
सौ. जुहिली सावंत,
विक्रम आडसूळ,
दादासाहेब शेलार,
लेखक संदिप कदम,
सौ.सरिता चितोडकर,जेष्ठ समाजसेविका व समुपदेशक आदी मान्यवर उपस्थित होते.
या ऑनलाईन बालकाव्य साहित्य संमेलनाचे आयोजन श्री. सोमनाथ बंड, श्री. सोमनाथ लंघे,सौ.हर्षना म्हाळसकर, श्री. मनोज म्हाळसकर, सौ. ज्योती लाळगे दत्तात्रय पाचर्णे,श्रीमती सुजाता गायके,श्रीमती. प्रतिमा भुजंगे,श्री.सचिन झुंजार,श्री.गोरक्ष हिंगे,श्री.गणेश कापरे,व सर्व शिक्षक वृंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारेगाव भिवर, ता.दौंड,जि. पुणे. यांनी केले होते.