भविष्यात पुण्याच्या दोन महापालिका- उपमुख्यमंत्री अजित पवार..

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पुणे – दि ३० ऑगस्ट २०२१
वाढते नागरीकरण , लोकसंख्या आणि औदयोगिकरण पाहता येणाऱ्या पुढील काळात दोन महापालिका स्थापन कराव्या लागतील. भविष्यकाळात पुणे शहराच्या पूर्व भागासाठी हडपसर तसेच पिंपरी चिंचवड शहराच्या नदीच्या पलीकडे चाकण, राजगुरूनगर या भागातही पालिका स्थापन कराव्या लागतील. त्यामुळे या भागात महापालिका स्थापन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या पायाभूत सुविधा तसेच जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पीएमआरडीए ने विकास आराखाड्यात नियोजन करावे. अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
पुण्यात विधानभवन येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. PMRDA च्या विकास आराखड्याची माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील खासदार , आमदार यांची बैठक घेतली. सर्वांनी या प्रारूप विकास आराखड्याचे स्वागत केले. ज्या सुचना इथल्या स्तरावर मान्य करता येईल त्यावर निर्णय घेतला जाईल. जर काही विषयासंदर्भात मुख्यमंत्री व नगर विकासमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतले जातील असेही सांगितले. पुण्यात पूर्वेच्या हडपसर महापालिकेची चर्चा सुरु आहे. पिंपरी चिंचवड मध्ये नदीच्या पलीकडे असलेल्या चाकण, राजगुरूनगर भागात वाढत्या औद्योगिकरण व लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. भविष्यात या दोन्ही ठिकाणी महापालिका स्थापन करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी रस्ते, रेल्वे आदि पायाभूत सुविधांचा विचार करण्यात यावा. तसेच पोलीस विभाग व शासकीय कार्यालयासाठी च्या जागेसाठी आराखड्यात नियोजन करावे आशा सूचनाही दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *