जेष्ठ कवी शिवाजीराव चाळक यांना गदिमा पुरस्कार

ओझर प्रतिनिधी: मंगेश शेळके

दि.३० ऑगस्ट २०२१ (ओझर): चाळकवाडी ( ता. जुन्नर) येथील शिवांजली साहित्यपीठाचे संस्थापक अध्यक्ष व कवी इंजि.शिवाजी चाळक यांच्या “जंगल दंगल” या बाल कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, गदीमा कुटुंबीय व महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद यांचे वतीने दिला जाणारा गदीमा साहित्य पुरस्कार जाहिर झाला आहे.


शिवाजी चाळक हे कुकडी प्रकल्पातील निव्रुत्त अभियंता असुन त्यांचा “अर्घ्य” हा कविता संग्रह व “पाखरमाया”बाल हा कवितासंग्रह प्रकाशित आहे.या ही साहित्यकृती विविध पुरस्काराने सन्मानित झालेल्या आहेत. ते गेल्या पंचविस वर्षांहून अधिक काळ चाळकवाडी या ठिकाणी शिवांजली साहित्यपीठाच्या माध्यमातून शिवांजली साहित्य मोहत्सवाचे आयोजन करत असतात या शिवांजली साहित्य मोहत्सवाच्या माध्यमातून त्यांनी अनेक नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले असून शिवांजली साहित्य पुरस्कार देऊन या साहित्यिकांना प्रोत्साहित केले आहे.


दोन हजार वर्षाहून अधिक काळापुर्विचा मराठी भाषेचा आद्य शिलालेख असलेल्या नाणे घाट ते चाळकवाडी- पिंपळवंडी या मराठी भाषा दिंडीचे प्रवर्तक आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनात त्यांनी निमंत्रित कवी म्हणून वेळोवेळी सहभाग नोंदविला आहे.
शिवाजी चाळक यांनी पुण्याच्या बंधुता प्रतिष्ठाणच्या माध्यमातून बाराव्या बंधुता साहित्य संम्मेलनाचे आयोजन केले होते
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *