मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा भीषण अपघात

३० नोव्हेंबर २०२२


मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनाताना पहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा महामार्गावरील बोर घाटात भीषण अपघात झाला असून तीन ट्रक समोरासमोर एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला. धडक एवढी जोरात होती की, ट्रक जवळ असलेल्या १०० फूट दरीत पलटी झाला आहे. \ घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केले आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पहाटेच्या सुमारास मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गावरील ढेकू गावाजवळ तीन वाहनांनी एकमेकांना जोरदार धडक दिली. एक्सप्रेसवेवरील बोरघाटात तीन ट्रकनी एकमेंकांना धडक दिली. यानंतर त्यापैकी एक ट्रेलर 100 फूट खोल दरीत कोसळला. तर दुसऱ्या ट्रकची केबिन या ट्रेलरपाठोपाठ दरीत कोसळली. तर तिसरा ट्रक रस्त्यात पलटी झाला. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील उतारावर हा अपघात झाला असून दरीत कोसळलेल्या कंटेनर ट्रकमधील चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर, दरीत कोसळलेल्या ट्रकच्या केबिनमधील चालकाला सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *