माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नी सौ.आनुराधा ढोबळे यांचे निधन…

  मोहोळचे माजी आमदार तथा माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे यांच्या सुविद्य पत्नी अनुराधा लक्ष्मण ढोबळे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने पुणे येथील खासगी रुग्णालयात दि ४ मे रोजी पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५८ वर्षे होते…

‘सावली’ वुमेन्स फाउंडेशन च्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या पश्चात पती माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, मुलगा अभिजीत ढोबळे, सून शारोन अभिजीत ढोबळे, दोन मुली क्रांती आवळे व कोमल साळुंखे तसेच जावई अब्राहम आवळे, अजय साळुंखे व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या जाण्याने शाहू परिवार व महात्मा फुले सूत गिरणी परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *