भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आर्या फाउंडेशन तर्फे करण्यात आले ७५ झाडांचे वृक्षारोपण…

ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके

दि.१६ ऑगस्ट २०२१ (ओझर) : भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आर्या फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे विद्यमान विश्वस्त मिलिंद भाऊ कवडे यांच्या वतीने प्राथमिक शाळा मराठी ओझर नंबर २ ,ओझर गावठाण, खळवाडी ,ओझर हायस्कूल, ओझर नं. १ इत्यादी ठिकाणी ७५ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले .आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष मिलिंद भाऊ कवडे वृक्षारोपण करताना म्हणाले की “कोरोणाच्या काळात अनेक जणांना ऑक्सिजन अभावी आपले जीव गमवावे लागले.

ऑक्सिजनचे बेड उपलब्ध झाले नाही , त्यामुळे ऑक्सिजन आयुष्यात किती महत्त्वाचे आहे हे निसर्गाने मानवाला दाखवून दिले आहे. तर हे वृक्षारोपण आपल्यासाठी नव्हे तर भावी पिढीच्या आयुष्यासाठी हे वृक्षारोपण आपण करीत आहोत .ही रोपे नुसती लावायची नाही तर यांचे शेवटपर्यंत संगोपन करून एका वृक्षामध्ये रूपांतर आपणा सर्वांना करायचे आहे. तसेच वृक्ष मोठे झाले की लहान-मोठे ,गरीब श्रीमंत ,राजकीय पक्ष असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना सावली देतात ,ऑक्सिजन देतात .

आपण सर्वांनीही या वृक्षाप्रमाणे त्याचे सर्व गुण अंगी ठेवावे व सर्वांना सहकार्य करावे .तसेच आर्या फाऊंडेशनचा गावच्या अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विशेष असा पुढाकार असतो. यावेळी अनेक मान्यवर व्यक्तींच्या हस्ते फळझाडे व वनौषधी रोपांचे या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षरोपणा वेळी आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष मिलिंद भाऊ कवडे त्यांचे सर्व सभासद ओझर नं.१ व २ चे सरपंच -उपसरपंच, विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी ,तरुणवर्ग ,कार्यकर्ते ग्रामस्थ ,महिला अधिकारी वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *