बी.डी.काळे महाविद्यालय येथे, वाचक दिनाचे औचित्य साधून, मराठी विभागामार्फत रंगले ऑनलाईन कविसंमेलन…

दि.१९ घोडेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
घोडेगाव – येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने वाचक दिनाच्या निमित्ताने नुकतेच “उत्तर पुणे जिल्ह्यातील कविंचे आॕनलाईन काव्यसंमेलन” झूम मंचावर संपन्न झाले.महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आदेशान्वये हा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.इंद्रजित जाधव हे होते.

या काव्यसंमेलनात मंचरचे सुप्रसिद्ध कवी प्रा.डॉ. संतोष पवार,प्रा.डॉ.हनुमंत भवारी,पाबळ, तालुक्यातील उदयन्मुख कवी श्री.मोहन नंदकर,फुलवडे, श्री.मनोहर मोहरे,फुलवडे,डॉ.गणेश सोनवणे,पाबळ, महाविद्यालयातील नवोदित कवी श्री.विनोद काळे, घोडेगाव, प्रा.डॉ.दिलीप कसबे, चाकण,श्री.समीर गारे,कु.सायली घुले इ.नी आपल्या स्वरचित कविता,गझला,गाणी,लावणी सादर करून उपस्थित रसिक श्रोत्यांची मने जिंकली. काव्यसंमेलनासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.अजित दत्तात्रय काळे, सचिव मा.अॕड.मुकुंद भगवंतराव काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा.अॕड.संजय दत्तात्रय आर्विकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.कार्यक्रमाचे संयोजन मराठी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर, प्रा.डॉ.पुरुषोत्तम काळे, प्रा.पोपटराव माने आदीने केले.
