पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन अजित पवारांच्या हसते संपन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटन व भूमिपूजन सोहळ्यासाठी आले अहेत.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कासरवाडी येथे गवळी माथा येथील घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.यावेळी अजित पवार यांनी संपूर्ण कचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली व त्याची माहिती महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून जाणून घेतली.या उद्घाटन कार्यक्रमा वेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अश्विनी जगताप,पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे,माजी आमदार विलास लांडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे व इतर प्रशासकीय अधिकारी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *