श्री करंजुदेवी ग्रामदेवता व मारुती मंदिर ट्रस्ट या नुतन कार्यालयाचे उद्घाटन गोवर्धन उद्योग समूहाचे मालक शरद बँकेचे अध्यक्ष देवेद्रभाई शहा यांच्या हस्ते संपन्न…

घोडेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
पोखरकरवाडी (पिंपळगाव घोडे ) ता. आंबेगाव येथील
करंजुदेवी ग्रामदेवता व मारुती मंदिर ट्रस्ट उद्घघाटन समारंभ गोवर्धन उद्योग समूहाचे मालक शरद बँकेचे अध्यक्ष देवेद्रभाई शहा यांच्या हस्ते संपन्न झाले. गावकऱ्यांनी शहा साहेबांचे ढोल ताशा फटाके लाऊन जोरदार स्वागत केले.

ट्रस्टचे अध्यक्ष बजरंग पोखरकर यांनी त्यांचा सत्कार केला. गावसाठी विविध योजना कशा राबवता येईल आपल्या गावच्या विकासासाठी ट्रस्टच्या नूतन कार्यालयातून  विविध विकास कामे मार्गी लावण्याचा युवकांचा प्रयत्न हा अभिमान स्पद आहे. तुमच्या गावातील सर्व समस्या ह्या माझा समस्या आहेत तुम्ही वळसे पाटील साहेबांवर , किरणताई वर जेवढं प्रेम करता त्या पेक्षा जास्त प्रेम साहेब आणि ताईं च प्रेम तुमच्यावर वडिलांवर आहे. तुमची विकासाची गंगा कुठेही मी थांबू देणार नाही तुमच्या सर्व मागण्या  मी स्वतः साहेबांच्या माध्यमातून पूर्ण करून देईल,तसेच मारुती मंदिरासाठी हि निधी कमी पडू देणार नाही. असा विश्वास शहा साहेबांनी  गावकऱ्यांना दिला.वाडीमधे पाण्याची मोठी समस्या आहे जागा नसल्याने निधी पडून आहे. परंतु या कार्यक्रम मुळे  नळ पाणी पुरवठा योजना राबविणे साठी 2 गुंठे जागा हुसेन शेख यांनी दिली त्यांच्या सत्कार देवेंद्र भाई यांच्या हस्ते करण्यात आला. पाण्याच्या जागेचा प्रश्न सुटल्याने महिला वर्गासह गावकरी खुश झाले कार्यक्रम यशस्वी झाल्याचे सगळयांच्या तोडून एकु यायला लागले प्रौढ मंडळी नी तुम्ही लक्ष्मी पुत्रालाच आपल्या गावात आणले मग आपले प्रश्न सोटणारच असे सांगत साहेबांचे अभिनंदन केले. 


या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष श्री बजरंग पोखरकर, सचिन गव्हाणे, मधूअप्पा बोऱ्हाडे, कुंदनभाऊ काळे,अजितराजे काळे, काळेवाडी दरेकरवाडीचे कार्यकुशल उपसरपंच मंगल जैद, वळसे पाटील साहेबांचे विश्वासु हुसेन भाई शेख,निलेश पोखरकर,दत्ता पोखरकर, शंकर दादा पोखरकर, जालिंदर पोखरकर,दत्ता  पोखरकर,किरण पोखरकर,सचिव – सचिन लाडके, एकनाथ लाडके सर,तुषार गोरे,शंकर गाडेकर , गोरक्ष पोखरकर, नथू मामा गव्हाणे,शरद गव्हाणे, कचर गुंजाळ,रामदास पोखरकर, रामकृष्ण लाडके,बाळू लोहकरे,अमित लोहकरे, किरण पोखरकर,संतोष पोखरकर,आशिष पोखरकर,गणेश पोखरकर,मच्छिंद दांगट,शंकर दांगट,धोंडीबा पताडे, आदि मान्यवरांसह स्थानिक गावकरी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *