निघोजमधे एकाच दिवशी १८ जणांना कोरोनाची बाधा..तर, तालुक्यामधे तब्बल ३० जणांना कोरोनाची लागण..

दत्ता गाडगे – विभागीय संपादक

पारनेर तालुक्यातील निघोजमधे दि.११ सप्टेंबरला एकाच दिवशी १८ जणांना कोरोनाची बाधा झाली असुन, त्यामधे एकाच कुटुंबातील सदस्यांची संख्या मोठी आहे. काही दिवसांपूर्वी निघोजचे रहीवाशी व पारनेर पंचायत समितीचे माजी उपसभापती नानासाहेब वरखडे यांचे कोरोनाने निधन झाल्याची बातमी ताजी असतानाच,एका पत्रकारासह आता तब्बल १८ जणांना तर तालुक्यामधील ३० जना कोरोना संसर्ग झाल्याची माहीती पारनेरचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. प्रकाश लाळगे यांनी दिली. त्यामुळे निघोजसह पारनेरमधे चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र नागरीक अजुनही या गोष्टी कडे गांभार्याने पहात नाही.

पारनेर तालुक्यामधील सुरवाती ची परीस्थिती वेगळी होती परंतु आता ती बदलली आहे. दि.११ सप्टेंबरपर्यंत तालुक्यामधे ११०४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.२८ जणांचा मृत्यु झाला आहे.तालुक्यामधे सध्या २१५ पेशंट उपचार घेत असुन,८६१ रुग्ण बरे होवुन घरी गेले आहेत.

११ सप्टेंबरच्या तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.प्रकाश लाळगे यांचेकडुन प्राप्त झालेल्या माहीती नुसार,निघोज १८,लोणीहवेली १,सुपा १, डिकसळ १,राळेगण थेरपाळ २,कर्जुलेहर्या १,गोरेगांव १,जवळा २,बाभूळवाडा १, चोंभूत १, कुरुंद १ अशी कोरोना बाधीत रुग्णांची आकडेवारी आहे.प्रशासन,तहसिलदार ज्योती देवरे,पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी वेळोवेळी सुचना देवुनही नागरीकांना या गोष्टीचे गांभीर्य नाही.