सीएसआरच्या माध्यमातून लायन्स क्लब इंटरनॅशनलकडून अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद यांना डेंटल चेअर…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी – दि १३ ऑगस्ट २०२१
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने सेवानिवृत्त माजी सैनिकांच्यासाठी चालविण्यात येणा-या अंशदायी आरोग्य योजना दातांचे पॉलीक्लिनीकसाठी आवश्यक ती खुर्ची सीएसआरच्या माध्यमातून लायन्स क्लब इंटरनॅशनलकडून मिळवून दिल्याबद्दल अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद यांच्या वतीने कर्नल एस. पी. शुक्ला व मेजर आर. के. सैनी यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचे आभार व्यक्त केले तसेच लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि महानगरपालिकेचे सीएसआरचे प्रमुख निळकंठ पोमण, सल्लागार विजय वावरे व श्रुतिका मुंगी यांचेही आभार व्यक्त केले.

तसेच स्पार्क मिंडा फाऊंडेशन व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी येथील दिव्यांगासाठी विशेष लसीकरण मोहिम राबविण्यासाठी सहकार्य करणा-या स्पार्क मिंडा कंपनीच्या अधिकारी नितीका गुल्हाने, निलेश पावले, सुमेध लव्हाळे, योगिता मार्काईकर, मोहिनी वल्हवले, किर्ती डोनकर यांना प्रशस्तीपत्रक देऊन आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दिव्यांगांसाठी आणखी उपक्रम राबविण्यात असल्याचे स्पार्क मिंडा फाऊंडेशन यांनी जाहीर केले. तसेच लायन्स क्लबच्या वतीने शालेय विद्यार्थी व शिक्षकांसाठी विशेष उपक्रम राबविण्याची संधी महानगरपालिकेने द्यावी असे आवाहन लायन्स क्लबचे ओमप्रकाश पेठे, अमृतराव सावंत, हरी नायर, भगवान गवई यांच्या पथकाने आयुक्त राजेश पाटील यांना केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही माजी सैनिक व त्यांच्या विधवांच्या नावाने मालमत्ता असलेल्या करात सवलत देत आहेत. श्री. मेजर रविकांत सैनी आणि श्री. एस. पी. शुक्ला यांनी नगरसदस्य एकनाथ पवार यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याशी संपर्क साधून डेंटल चेअर उपलब्ध करुन देण्याबाबत सहकार्य करण्याची विनंती केली होती. त्यानंतर सीएसआर उपक्रमांतर्गत लायन्स क्लब इंटरनॅशनलने ही डेंटल चेअर उपलब्ध करुन दिल्यामुळे माजी सैनिकांना त्याचा मोठा प्रमाणावर लाभ होत असून माजी सैनिकांनी महापालिकेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *