समतावादी पार्टी व शारीरिक शिक्षण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक भान जपत रक्तदान शिबिराचे आयोजन…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

प्राधिकरण- दि ८ ऑगस्ट २०२१
सध्या कोरोणाच्या महामारीत शहरात कोरोनाचे रुग्ण असल्याने रक्ताची गरज ही लागतच आहे. त्यामुळे त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक भान जपत रक्तदान शिबिराचे आयोजन समतावादी पार्टी आणि शारीरिक शिक्षण महामंडळ पिंपरी चिंचवड यांच्या पुढाकाराने आज रविवार दि ८ ऑगस्ट रोजी मल्लिकार्जुन मंदिर निगडी प्राधिकरण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


सकाळी दहा वाजता मल्लिकार्जुन मंदिर निगडी प्राधिकरण येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन सौ सुनिता अशोक नगरकर यांच्या हस्ते शारीरिक शिक्षण महामंडळाचे अध्यक्ष फिरोज शेख, उपाध्यक्ष मृदुला महाजन, कार्याध्यक्ष रफीक इनामदार ,सचिव महादेव फपाळ ,संचालक निवृत्ती काळभोर सर व मल्लिकार्जुन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखर दलाल, उद्योजक बाळासाहेब नाकाडे ,सुरेश लिंगायत, अनंत शिंदाळकर , चंद्रकांत खोचरे ,सुधाकर कुंभार, पार्टी सचिव अभिजीत हांचे, पार्टी खजिनदार संगमेश्वर शिवपुजे ,सिद्धरमेश नवदगिरे, संतोष बिराजदार, शिवशरण बडदाळ, सिंधुताई नावदगिरे ,उद्योजक वैशालीताई घाटके यांच्या उपस्थितीत पार पडले.


यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप पांढरकर, व बाळासाहेब नाकाडे यांनी कार्यक्रमस्थळी भेट दिली. यावेळी अध्यक्ष फिरोज शेख यांनी रक्तदान श्रेष्ठ दान असल्याचे सांगत ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असून प्रत्येकाने ते करायला हवे व इतरांनाही रक्तदान करण्यास प्रवृत्त करावे असे सांगितले. तर आजच्या या जागतिक महामारीच्या निमित्ताने रक्तदान करणे ही समाज्यासाठी गरज आहे त्यामुळे आपला खारीचा वाटा असावा म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अशाच सामाजिक उपक्रमात आपण नेहमीच सहभागी होत असतो व भविष्यातही अनेक समाजउपयोगी उपक्रमात आपल्या शारीरिक शिक्षक महामंडळा चा सहभाग असेल असे सचिव महादेव फापाळ यांनी बोलताना सांगितले.
या उपक्रमात दोन्ही संस्थांच्या सदस्यांनी रक्तदानात सहभाग घेत ४३ जणांनी रक्तदान करून सामाजिक भान जपले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्षा मृदुला महाजन यांनी केले व सुत्रसंचलन मनीषा कलशेट्टी यांनी केले. तर या कार्यक्रमाचा योग घडवून आणणारे बसवेश्वर कणजे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दोन्ही संस्थांच्या पदाधिकारी व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *