पिंपरी चिंचवड च्या सोनल बुंदेले यांची महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या असोसिएशनच्या सह सचिवपदी निवड…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी – दि १२ ऑगस्ट २०२१
काल रविवार दि ८ ऑगस्ट रोजी अमरावती येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य आर्चरी असोसिएशनची निवडणूक पार पडली त्यामध्ये पिंपरी चिंचवड च्या सोनल बुंदेले यांची सह सचिव या पदावर बहुसंख्य मताने विजयी होऊन निवड झाली आहे. त्यांच्या भावी कारकिर्दीस व पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा.


सोनल बुंदेले या गेली १० वर्षांपासून संघटनेच्या संघटनात्मक कार्यात जोडल्या गेलेल्या आहेत. त्या पिंपरी चिंचवड येथे २००९ पासून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या खेळाच्या करकीर्दीस शालेय जीवनापासून अमरावती या ठिकाणाहून सुरवात केली होती. अनेक राज्य, राष्ट्रीय पदके व आंतरराष्ट्रीय पदक त्यांनी मिळवली आहेत. सध्या त्या पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहे. पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेच्या सचिवपदी त्या कार्यरत आहेत. त्यांना आपला आवाज च्या नारीशक्ती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांची आर्चरी ची स्वतःची अकादमी असून त्यांनी 100हून अधिक राष्ट्रीय खेळाडू, 500हून अधिक राज्य स्तरीय खेळाडू व तसेच एक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचे काम केले आहे. आता पिंपरी चिंचवड शहरामधे जास्तीत जास्त खेळाडू तयार करून,आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवण्याचे स्वप्न त्या उराशी बाळगून आहेत त्या दिशेने त्यांची पुढील वाटचाल असणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्या ह्या कार्यामध्ये पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष श्री. सुभाष मंत्री यांचे सहकार्य लाभले.
नवीन कार्यकारिणी ;-

अध्यक्ष –
1) श्री प्रशांत देशपांडे सर
(अमरावती )

उपाध्यक्ष-
1) हरिदास रणदिवे सर.
(सोलापूर )
2) श्री उदय नाईक सर (डोंबिवली)

सचिव –
1) प्रमोद चांदुरकर सर.
(अमरावती )

सहसचिव –
1) सौ.सोनल बुदेले.
(पिंपरी चिचवड )

कोषाध्यक्ष- –
1)श्री रंगराव साळुंखे सर
(हिगोली )

सदस्य –
1) अभिजीत दळवी सर
(अहमदनगर )
2)श्री धनंजय वानखेडे सर
(वाशिम )
3)सौ.पूनम महात्मे
(मुबई )
4) श्री प्रविण गडदे सर
(उस्मानाबाद )
5) श्री लक्ष्मीकांत खीची सर
(औरंगाबाद )
6) श्री बाबासाहेब जाधव सर
(सातारा)
महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन च्या निवडणुकीत निवडणूक अधिकारी श्री चंद्रशेखर डोरले, दिलीप तिवारी व सहसंचालक श्री विजय संतान यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या असोशियशन ची निवडणूक पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *