विशेष श्रमसंस्कार शिबीर उत्साहात संपन्न ….

रोहित खर्गे
विभागीय संपादक
३ मार्च २०२२

भोसरी


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मौजे शेलु तालुका खेड, जिल्हा -पुणे या ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न पार पडले. या शिबिराचे उद्घाटन मा.श्री शरद बुट्टे पाटील जिल्हा परिषद सदस्य पुणे यांच्या हस्ते पार पडला .त्यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनात व्यक्तिमत्व विकास जडणघडणीसाठी राष्ट्रीय सेवा योजना स्तुत्य उपक्रम आहे, श्रमसंस्कार व पर्यावरण संवर्धन हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक समजला जातो असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री विलास लांडे यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी समाजाच्या गरजा व समस्या ओळखून त्या समस्या सोडवण्यासाठी सतत कार्यरत राहावे असा विद्यार्थ्यांना संदेश दिला. अमोल पवार (मा.उपसभापती पंचायत समिती खेड) यांनी मनोगतात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व पटवून दिले. तसेच शिबिराचा समारोप प्रमुख पाहुणे कैलास गाळव ( मा.उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खेड) माजी जिल्हा परिषद सदस्य सदाशिव महादेव करंडे यांच्या उपस्थितीत व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

सात दिवसीय शिबिराच्या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेतील ७५ स्वयंसेवकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर स्वच्छ करून खड्डे खोदून वृक्षारोपण करून पाणी देण्यात आले. भामचंद्र डोंगर येथील मंदिराचा परिसर स्वच्छ करण्यात आला .तसेच मंदिरा समोरील पटांगणातील झाडांना आळे करून पाणी देण्यात आले. गडावरील प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. शेलू गावातील मंदिराची साफसफाई ग्रामपंचायत परिसर स्वच्छ करण्यात आला..आदिवासी वस्ती ठाकरवाडी या परिसराची स्वच्छता व लोकवस्तीचे सर्वेक्षण करण्यात आले, तसेच अंगणवाडी परिसर स्वच्छ करून झाडांना आळे करून पाणी देण्यात आले. शेलगाव मध्ये प्रभात फेरी काढून समाजप्रबोधन केले. दुपारच्या सत्रात विविध तज्ञ व्याख्यात्यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते त्यामध्ये डॉ. वसंत गावडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांची भूमिका व योगदान स्पष्ट केले. प्रा. बी आर घोडके यांनी कोरोनामुक्त गाव व जनजागृती विषयी कविता सादर केल्या. प्रा.अभिषेक आकणकर यांनी पर्यावरण जैव विविधता व संवर्धन या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले प्रा. वैशाली वाघुले यांनी व्यक्तिमत्व विकासावर व्याख्यान दिले प्रा. निलेश पबॆत यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवात युवकांचे योगदान अशा विषयावर विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. सायंकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांनी पथनाट्य, भावगीते, लोकनृत्य, एकांकिका, मनोरंजनात्मक खेळ, कथाकथन अशा वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे समाज प्रबोधन करण्यात आले. शिबिराच्या समारोप प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी कमलेश जगताप यांनी मनोगत व्यक्त केले व राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थीनी मयुरी टेंगळे व विजय दहिंजे यांनी मनोगत व्यक्त केले.

सदर शिबिराच्या उद्घाटन व समारोपप्रसंगी शेलू गावचे सरपंच अक्षय पडवळ ,कृषिरत्न दूध समूहाचे अध्यक्ष कृष्णराव सांडभोर ,मा.चेअरमन ज्ञानेश्वर पडवळ, गणेश बोत्रे (माजी सरपंच खालुम्ब्रे) शिंदे गावचे सरपंच सचिन देवकर, बोरदरा गावचे सरपंच किरण पडवळ, भामचंद्र विद्यालयाचे खजिनदार मारूती पडवळ ग्रामपंचायत सदस्य अक्षय गाडे , योगेश सांडभोर, मच्छिंद्र कचाटे, संदीप बधाले, दत्तात्रय पडवळ, युवराज लिंबोरे माजी चेअरमन बाळासाहेब ज्ञानेश्वर पडवळ स्कूल समितीचे अध्यक्ष काळूराम करंडे, कैलासदादा पडवळ, नारायण गाडे, संतोष सांडभोर ज्ञानेश्वर सांडभोर बाळासाहेब ठोंबरे, तानाजी खैरे (मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा )आदी मान्यवर उपस्थित होते .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील सर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गोपीचंद करंडे प्रा.दीपक पावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.देवदत्त शेळके यांनी केले .सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी ,प्रा. व्ही. एस. पाटील, डॉ.गणेश चव्हाण, प्रा.अनिल गंभीरे तसेच ७५ स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. संपूर्ण शिबिराचे नियोजन प्रा.कमलेश जगताप (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) प्रा.रेश्मा लोहकरे (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी)प्रा.व्हि. प्रा.शीतल गुगळे, प्रा.सविता वीर, प्रा.मीनाक्षी मांढरे,प्रा.सुनीता नाबरिया प्रा. रेश्मा लांडगे यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *