बातमीदार: रोहित खर्गे, विभागीय संपादक
दि. 20 ऑक्टोबर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील उपमहापौर तुषार हिंगे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदाकरिता येत्या 6 नोव्हेंबर रोजी निवड होणार आहे. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांची पीठासीन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सहा नोव्हेंबर रोजी उपमहापौर पदाची निवड करण्यात येणार आहे. असे विभागीय आयुक्त सौरव राव यांनी सांगितले…