अभिलाष वसंत घावटे, शिरूर ग्रामीणच्या उपसरपंच पदी विराजमान…

रामलिंग / शिरूर
बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिरूर : दि. 22/07/2021.

       शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवड नुकतीच झाली असून, सर्वानुमते उपसरपंच पदी अभिलाष वसंत घावटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
       उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर  त्यांना शिरूर व शिरूर पंचक्रोशीतील मित्रमंडळी, नातेवाईक व आप्तेष्टांनी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून अभिनंदन करत, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
      कार्यक्रमावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवभाऊ घावटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, आदर्श सरपंच अरुणराव दादाभाऊ घावटे, शिरूर ग्रामीणचे प्रथम लोकनियुक्त सरपंच विठ्ठल गणपत घावटे, विद्यमान नगरसेवक नितीन पाचर्णे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष मोरे, वाडेगव्हाण वि. का. से. स. सोसायटीचे व्हाईस चेअरमन संभाजी वारे, रामलिंग ग्रुप ग्रामपंचायतचे व माजी जेष्ठ ग्राम पंचायत सदस्य भाऊसाहेब घावटे आदी मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून, नूतन उपसरपंच अभिलाष घावटे यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.


      अभिलाष वसंत घावटे यांच्या उपसरपंच निवडीवेळी, सरपंचांसह संपूर्ण ग्राम पंचायत बॉडी व पंचक्रोशीतील मित्र परिवार व आप्तेष्ट उपस्थित होते. त्यात विद्यमान सरपंच नामदेव तात्या जाधव, मावळत्या उपसरपंच उज्वला संदीप नेटके, माजी उपसरपंच सागर अरुण घावटे, माजी उपसरपंच दीपाली नानाभाऊ देंडगे, माजी उपसरपंच आरती रमेश चव्हाण, माजी उपसरपंच निता माधव घावटे, माजी उपसरपंच तुषार रंगनाथ दसगुडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य अनिल पांडुरंग लोंढे, हिरामण हरिभाऊ जाधव, यशवंत देवराम कर्डीले, नितीन सुभाष बोऱ्हाडे, रंजना चंद्रकांत घावटे, संगीता संदीप दसगुडे, जयश्री अरुण महाजन व स्नेहल अमोल वर्पे हे विद्यमान सदस्य उपस्थित होते.
      ग्रामसेवक बाळासाहेब शेळके, ग्राम पंचायत लिपिक शिवाजी महाजन, लिपिक नारायण गायकवाड, संगणक ऑपरेटर राहुल मगर व सर्व सेवकवर्ग उपस्थित होते.
      अभिलाष घावटे यांची उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर, त्यांना त्यांच्या तरुण मित्रपरिवार, नातेवाईक व आप्तेष्टांनी प्रत्यक्ष हजर राहून शुभेच्छा दिल्या. शालेय जीवनापासूनच नेतृत्वाची चुणूक असणाऱ्या अभिलाष घावटे यांनी, विद्याधाम शाळेत शिकत असताना सलग चार वर्ष वर्गाचे मॉनिटर पद सांभाळले होते. त्यामुळे त्यांना पुढील जीवनात आपणही राजकारणात जाऊ, अशी मनात इच्छा निर्माण झाली होती. त्यामुळे मागे झालेल्या ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी निवडून येत, ही इच्छा पूर्णत्वास आणली व नुकतेच त्यांना सर्वानुमते उपसरपंच हे मानाचे पद मिळाले.
     “शिरूर व पंचक्रोशीचे ग्रामदैवत प्रभू रामलिंग महाराजांचा आशीर्वाद व रामलिंगच्या जुन्या जाणत्या व थोरामोठ्यांचा तसेच घरच्यांचा आशीर्वाद आणि मित्रपरिवाराचे मार्गदर्शन, यामुळेच मला हे मोठे पद भूषविण्याची संधी मिळाल्याचे”, त्यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कला माहिती देत असतानाच, जर “माझे वडील दिवंगत वसंतराव घावटे हे आज रोजी हयात असते, तर त्यांनाही आज खूप आनंद झाला असता” अशी भावनिक आठवणही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.
       प्रभू रामलिंग महाराजांचे महादेवाचे प्रसिद्ध स्थान असलेले जुने शिरूर, म्हणजेच रामलिंग गावठाण. पूर्वी रामलिंग ही ग्रुप ग्रामपंचायत होती. पंचक्रोशीतील गावांचा यात समावेश होता. परंतु, पुढे पंचक्रोशीतील या सर्व गावांच्या ग्रामपंचायत स्वतंत्र झाल्या, आणि  शीरुर ग्रामीण ग्रामपंचायत देखील स्वतंत्र होऊन, या ग्राम पंचायतचा स्वतंत्र कारभार सुरू झाला.
     शिरूर तालुका हा पूर्वी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जायचा. परंतु नंतर शिरूर तालुक्याला, सह्याद्री डोंगर रांगेतील धरणांतून पाटपाणी मिळू लागले आणि तालुक्यातील बागायत वाढू लागली. पुढे शिरूर तालुक्यात पंचतारांकित एम आय डी सी आली व शिरूर तालुक्याच्या वीकासाचा वेग झपाट्याने वाढू लागला. त्यामुळे तालुक्यातील शहरीकरणाचाही वेग वाढू लागला आणि शिरूर शहराला लागून असणारे रामलिंग म्हणजेच शिरूर ग्रामीणलाही महत्व प्राप्त होऊ लागले.
      त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात एक अग्रगण्य म्हणून ओळख असलेली शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत, अर्थात रामलिंग हिचे महत्व वाढतच असून, त्यामुळेच येथील राजकीय घडामोडींकडे सर्वच राजकीय मंडळींचे लक्ष लागून राहिलेले असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *