श्री विघ्नहर विद्यालयाचा दहावीचा निकाल लागला शेकडा शंभर टक्के…

ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके

दि.२१ जुलै २०२१ ओझर :श्रीक्षेत्र ओझर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री विघ्नहर विद्यालयाचा मार्च २०२१ मधील एस एस सी परीक्षेचा निकाल १००% लागला असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी संयुक्तरित्या दिली.


यावर्षी मार्च एस एस सी ला एकूण ८१ विद्यार्थी बसले होते त्यातील सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा शेकडा निकाल १००% लागला आहे.
विद्यालयात प्रथम पाच विशेष नैपुण्य मिळविणारे विद्यार्थी खालीलप्रमाणे-
१.भोर किरण अविनाश- ९७.४०
२.कर्डक शुभांगी सुनील- ९६.८०
३.मांडे अनुष्का अनिल- ९३.८०
४.मस्करे जागृती अरविंद- ९२.४०
५.भोर दिव्या संतोष- ९१.२०.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद यांचे संस्थेचे मानद सचिव ऍड.संदिप कदम,उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे,उप सचिव एल एम पवार,सह सचिव प्रशासन ए एम जाधव व खजिनदार ऍड.मोहनराव देशमुख आदी पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट, विविध सहकारी संस्थांच्या वतीने विद्यालयाचे व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

One thought on “श्री विघ्नहर विद्यालयाचा दहावीचा निकाल लागला शेकडा शंभर टक्के…

  • July 22, 2021 at 1:46 pm
    Permalink

    Nice keep it up

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *