नामदार अजितदादा पवार यांच्या जन्मदिनानिमित्त संस्थेच्या सर्वच शाखांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन- मानद सचिव ॲड. संदीप कदम

ओझर प्रतिनिधी:मंगेश शेळके

दि.२०जुलै २०२१(ओझर) : मा. ना. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त व संस्थेचे महाविद्यालय व शाळा यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन.करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ना. अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व संस्थेशी संलग्नित असलेल्या अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर, श्री म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डी श्री हरणेश्वर विद्यालय, कळस, न्यू इंग्लिश स्कूल, डाळज, न्यू इंग्लिश स्कूल, मांडकी, न्यू इंग्लिश स्कूल, इनामगाव व श्री गुरुदेव दत्त विद्यालय, संविदने या शाखांचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्यावतीने विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर उपक्रमांच्या आयोजना संदर्भात माहिती देताना पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम म्हणाले की, आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमीत्त दरवर्षी पुणे ते बारामती राष्ट्रीय स्तरावरील सायकल रॅलीचे आयोजन केले जाते. परंतु कोरोनाच्या यावर्षी सायकल स्पर्धा घेता आली नाही. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनंत व्याख्यानमाला व आंतरराष्ट्रीय वेबिनार चे दि. २२ जुलै २०२१ ते २५ जुलै २०२१ या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
अनंत व्याख्यानमालेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा. दिलीप वळसे – पाटील यांच्या शुभहस्ते व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण मा. डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
विद्यार्थी व शिक्षकांना बौद्धिक मेजवानी देणाऱ्या अनंत व्याख्यानमालेमध्ये ग्लोबल टिचर अवॉर्ड विजेते मा. रणजीतसिंह डिसले (गुरूजी) हे ‘माहिती व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण पद्धती’ या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत. त्याचप्रमाणे दैनिक दिव्य मराठीचे मुख्य संपादक मा. संजय आवटे हे ‘आम्ही भारताचे लोक’ या विषयावर मार्गदर्शन करून दुसरे पुष्प गुंफणार आहेत.
नवीन शैक्षणिक धोरण २०२० व निर्मिती भारतीय संविधानाची’या विषयावर खासदार व नियोजन आयोगाचे माजी सदस्य मा. डॅा. नरेंद्र जाधव हे मार्गदर्शन करून तिसरे पुष्प गुंफणार आहेत. प्रसिद्ध इतिहास संशोधक मा. गणेश शिंदे हे ‘मानसिक ताणतणाव मुक्तीतून आनंदी जीवनाकडे या विषयावर मार्गदर्शन करून चौथे पुष्प गुंफणार आहेत. आरोग्यविषयक जनजागृती करिता दि. २३ जुलै २०२१ रोजी आयुर्वेद रुग्णालय व स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, आकुर्डी यांच्या वतीने मोफत कृत्रिम सांधेरोपण व दुर्बिणीद्वारे स्नायू, दुरुस्ती शस्त्रक्रिया या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे यांच्या शुभहस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मा. पार्थ पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
त्याचप्रमाणे दि. २३ व २४ जुलै रोजी ‘रिसेंट ट्रेंड इन लाईफस्टाईल अँड हेल्थ मॅनेजमेंट’ या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. नितीन करमळकर यांच्या शुभहस्ते या आंतरराष्ट्रीय वेबिनारचे उद्घाटन होणार असुन राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेते व भारतीर हॉकी संघाचे माजी कर्णधार पद्मश्री मा. धनराज पिल्लेयांच्या उपस्थितीत या वेबिनारचा समारोप होणार आहे. कोविडमुळे बदललेली जीवनशैली व आरोग्य व्यवस्थापनावर चर्चा करण्यासाठी सदर वेबिनारमध्ये नतालिया साॅल्व्हे (अर्जेंटिना), राकेश तोमर व कौकब अझीम (सौदी अरेबिया), आशिष फुलकर (मध्य प्रदेश), श्रद्धा नाईक (महाराष्ट्र)हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांमधील मान्यवर तज्ञ उपस्थित राहणार आहेत.
त्याचबरोबर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाशी संलग्नित सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये दि. २२ जुलै २०२१ ते २५ जुलै २०२१ दरम्यान स्थानिक पातळीवर आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रश्नमंजुषा, राज्यस्तरीय एकांकिका व काव्यलेखन स्पर्धा, रोबोटिक्स, निबंध, चित्रकला, वक्तृत्व, रांगोळी, गायन / वादन, अभिनय इत्यादी स्पर्धांचे सुद्धा ऑनलाईन आयोजन केलेले आहे. तसेच अध्यापकांसाठी ई – कन्टेन्ट डेव्हलपमेंट, रिसर्च अविष्कार स्पर्धा, कवी संमेलन इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी कविसंमेलनाचे दि. २५ जुलै २०२१ रोजी दु. ४.०० वा आयोजन करण्यात आले आहे. सदर कवी संमेलनामध्ये आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार असून या कवी संमेलनाचे उद्घाटन राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा. आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते होणार असून ज्येष्ठ कवी, लेखक व चित्रपट निर्माते मा. रामदास फुटाणे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे सहा. आयुक्त मा. अनिल गुंजाळव प्रसिद्ध कवी, गायक मा. संदीप खरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून विद्यार्थ्यांना व रसिकांना कविता सादरीकरण करून मार्गदर्शन करणार आहेत. सदरील उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
बहुजन हिताय। बहुजन सुखाय!या ध्येयाने प्रेरित होऊन संस्था गेली ८० वर्षे शैक्षणिक कार्य करीत आहे. यावर्षी संस्थेच्या इ.१० वी चा निकाल १००% लागलेला असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी संस्था नेहमीच विविध शैक्षणिक उपक्रम राबवित असते. तसेच संस्थेतील विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी होऊन प्राविण्य मिळवीत असतात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था नियमितपणे अशा उपक्रमांचे आयोजन करते.
या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वितेसाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्रजी घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव ए.एम.जाधव यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा शिक्षण मंडळाशी संलग्नित सर्व शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.
सहभागा करिता झूम आयडी व पासवर्ड
सकाळ सत्र – ११.०० वाजता
आयडी – 834 2777 5310
पासवर्ड – 1212
दुपार सत्र – ४.०० वाजता
आयडी – 851 7202 6896
पासवर्ड – 1212

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *