२७, २८ डिसेंबर रोजी वनाझ ते गरवारे स्थानक मार्गावरील मेट्रोसेवा अंशतः बंद

पुणे : पुणे मेट्रोची वनाझ स्थानक ते गरवारे स्थानक भागातील मेट्रो सेवा सिग्नलिंग प्रणालीच्या चाचण्यांसाठी दिनांक २७ आणि २८ डिसेंबर २०२२ रोजी अंशतः बंद राहणार आहे.

मेट्रोने प्रसिद्धीपत्राद्वारे ही माहिती दिली आहे. पुणे मेट्रोमधील वनाझ स्थानक ते गरवारे स्थानक या मार्गावर सिग्नलिंग प्रणालीच्या चाचण्या
दिनांक २७ आणि २८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यादिवशी वनाझ स्थानक ते गरवारे स्थानक या मार्गावरील प्रवासी सेवा दुपारी २ वाजल्यानंतर सुरु होईल. सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत या भागातील प्रवासी सेवा उपलब्ध राहणार नाही
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक या मार्गिकेवरील प्रवासी सेवेत कोणताही बदल होणार नाही. या मार्गावरील प्रवासी सेवा सकाळी ८ ते सायं. ८ या वेळात नेहमीप्रमाणे सुरु राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *