आमोंडी येथे लग्नांची वरात काढणे पडले महागात, नवरदेवाच्या वडीलांसह डि.जे मालकावर धडक कारवाई…

घोडेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी

आमोंडी ता. आंबेगाव येथे हनुमान मंदीरासमोर मोकळ्या जागेत लग्नाच्या वरातीसाठी गर्दी केली तसेच विनापरवाना डि.जे साऊंड सिस्टीमवर ,विना मास्क लावून ,नाचण्यात येऊन जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नवरदेवाच्या वडिलांवर आणि डि.जे मालकावर घोडेगाव पोलिस ठयाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची फिर्याद पोलिस कॉन्स्टेंबल जालींधर रहाणे यांनी दिली आहे.


                 या बाबत पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी की , आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पोलिस स्टेशच्या हद्दीतील आमोंडी  गावातील हनुमान मंदीरासमोरील मोकळ्या जागेत मानवी जिवीतास धोकादायक असलेल्या कोरोना या विषाणुचा प्रादुर्भाव पसरण्याची जाणीव असताना  देखिल ,रोहीदास नामदेव फलके वय ६० वर्ष यांच्या मुलाच्या लग्नाच्या  वरातीमध्ये  विनामास्क, सोशल डिस्टंन्सचे पालन न करता अंदाजे ५० ते ६० नागरिक एकत्र येत वेळेचे बंधन न पाळता , इतरांच्या आरोग्याची कोणतीच काळजी न घेता विनापरवाना डि.जे सिस्टीमवर मोठया व कर्कश आवाजात हिंदी व मराठी गाणी वाजवुन व माननिय सर्वोच्च न्यायालय  यांनी घालुन दिलेल्या नियम व अटी तसेच माननिय पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करताना मिळुन आल्याने ,आरोपी  डि.जे मालक  विशाल नारायण बोऱ्हाडे वय २८ वर्षे रा. आमोंडी ता. आंबेगाव जि. पुणे  , नवरदेवाचे वडील रोहीदास नामदेव फलके वय 60 वर्षे रा. आमोंडी ता. आंबेगाव जि. पुणे यांच्या वर घोडेगाव पोलिस स्टेशन येथे गु.र.नं १५९/२०२१ भा. द. वि कलम १८८, २६९, २७० , ३४ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सदर गुन्ह्याचा तपास घोडेगाचे प्रभारी साहाय्यक पोलिस निरिक्षक लहु थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार एन.एम वायाळ हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *