भारतीय माजी सैनिकांची शिरूर तहसील कार्यालयात बैठक संपन्न…


शिरूर ,प्रतिनिधी
विभागीय संपादक, रवींद्र खुडे,शिरूर

भारतीय माजी सैनिकांची विविध विषयांवर प्रशासनाशी चर्चा करण्यासाठीची बैठक, नुकतीच शिरूर तहसील कार्यालयात पार पडली. ही बैठक, शिरुरचे निवासी नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीवेळी निवासी नायब तहसीलदार यांनी, उपस्थित सर्व माजी सैनिकांचे प्रशासनाच्या वतीने स्वागत करत, सर्व विषय ऐकून घेत त्यांच्या शंका कुशंकांवर अतिशय चांगल्या व समाधानकारक प्रकारे चर्चा घडऊन आणल्याचे मत, संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष संभाजी धुमाळ यांनी आपला आवाजचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांच्याशी बोलताना सांगितले.
त्यांनी यावेळी प्रशासनाला पटवून दिले की, माजी सैनिक किंवा त्यांचे कुटुंबीय किंवा त्यांच्या विरपत्नी, अशा सर्वांनाच प्रशासकीय कामात काही अडी अडचणी येत असतात. तसेच इतर नागरिकांप्रमाणेच, माजी सैनिकांच्याही अनेक समस्या असतात. अशा सर्व शासकीय पातळीवरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी, प्रशासनाकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा असल्याचे, यावेळी माजी सैनिकांनि बोलून दाखविले.
तहसील कार्यालयाच्या बहूउद्देशीय सभागृहात झालेल्या बैठकीवेळी, संघटनेचे कार्याध्यक्ष बबन सोनबा पवार, जे के कटके, तुकाराम डफळ, शहाजी धुमाळ, नंदकिशोर रोडे, सुरेश दरेकर, भरत गावडे, एकनाथ महाराज, आनंद ढमढेरे, दशरथ कापडे, सुरेश उमाप, भरत घावटे, तुकाराम पडवळ, सोमनाथ मचाले, विठ्ठल जाधव, तसेच यावेळी काही विर नारी उपस्थित होत्या. त्यात, कांचन प्रदीप सरोदे, मीरा मुरादे, रेखा थोरात, उर्मिला फलके, ज्योती सोमनाथ मचाले आदी मान्यवर उपस्थित होते.
त्याचप्रमाणे, अशा प्रकारची बैठक ही, दर महिन्याला तहसील कार्यालयात घडवून आणण्याची मागणी, यावेळी माजी सैनिकांनी केली. त्याला सकारात्मक होकार प्रशासनाने दिल्याचे समजतेय.