आपला पुणे जिल्हा वृत्तपत्र ,न्युज चॅनलचे मुख्य संपादक आब्दुलकादीर सय्यद यांचं निधन…
आंबेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
आपला पुणे जिल्हा वृत्तपत्र तसेच Apj न्यूज चॅनेलचे मालक व मुख्य संपादक तसेच महाराष्ट्र राज्य जन सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आब्दुलकादीर सय्यद सर , यांचे आज दुपारी २ वा. सुमारास अपघाती दुःखद निधन झाले. ते ५० वर्षाचे होते
त्यांच्या मागे आई – वडिल, पाच भाऊ, दोन बहिणी, पत्नी, दोन मुले असा मोठा परिवार आहे. सय्यद सर यांच्या निधनाने महाराष्ट्रात एका जाणत्या आणि अभ्यासू संपादकाला मुकल्याची प्रतिक्रिया यक्त होत आहे.
सय्यद सरांना सर्व पत्रकार, संपादक, उपसंपादक, कर्मचारी, वाचक, हितचिंतक जनसेवा संघाचे सर्व सभासद, तसेच आंबेगाव / जुन्नर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इलेक्ट्रॉनीक मिडीया तसेच प्रिंट मिडीया यांच्या कडून भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली जात आहे.
तसेच आपला आवाज न्युज नेटवर्कच्या वतीने ही भावपुर्ण श्रध्दांजली.