जुन्नर तालुक्यातील बांधाऱ्यांवर ढापे बसवण्यासाठी २० लाख ५९ हजार रुपयांचा निधी मंजूर:- पांडुरंग पवार
बेल्हे (वार्ताहर) :- जुन्नर तालुक्यातील कोल्हापूर बंधारे तसेच साठव बांधाऱ्यांवर ढापे बसवण्यासाठी २० लाख ५९ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदे अंतर्गत मंजूर झाल्या असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य पांडुरंग पवार यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत छोटे पाटबंधारे विभागामार्फत जुन्नर तालुक्यात ४५ कोल्हापुरी बंधारे व साठवण बंधारे बांधणे असून त्यांना पाणी अडवण्यासाठी दरवर्षी ढापे बसवले जातात.

या वर्षी ढापे बसवण्याची रक्कम जिल्हा परिषद पुणे मार्फत थेट संबंधित ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग केली जाणार असून त्यावर ग्रामपंचायतीने कार्यवाही करायची आहे.
या कामामुळे पाणी साठा उपलब्ध होणार असून शेती सिंचनासाठी या पाण्याचा शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याची माहिती पांडुरंग पवार यांनी दिली.