‘‘इंद्रायणी थडी’’त विद्यार्थी, कलावंतांसाठी सुवर्णसंधी

पिंपरी  : महाराष्ट्रातील सर्वात मोठी ‘‘इंद्रायणी थडी-२०२३’’ जत्रेत पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थी, आणि कलावंतांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या जत्रेत तब्बल २५ हून अधिक विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ज्याद्वारे नवोदितांच्या सुप्त कुलागुणांना वाव मिळणार आहे.

पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने  ‘‘इंद्रायणी थडी’’ जत्रा दि. २५ जानेवारी २०२३ ते दि. २९ जानेवारी २०२३ दरम्यान आयोजित केली आहे.

विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर घालणारे उपक्रम यामध्ये पहायला मिळणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील खाद्य संस्कृती, ग्राम संस्कृती, हस्तकला, अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती, ग्राम संस्कृती, पाटील वाडा, हास्य जत्रा, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, बालजत्रा, मॅजिक शो, फॅशन शो, नृत्य स्पर्धा आदी विविध विविध उपक्रमांचा आनंद घेण्यासाठी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा-महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांनी ‘‘इंद्रायणी थडी’’ आवश्य भेट द्यावी. तसेच, विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी राहुल पाखरे 88568 08833 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षीसे…
समन्वयक संजय पटनी म्हणाले की, महिला सक्षमीकरण, उद्योजकता विकास, नवोदितांना संधी या हेतुने आयोजित केलेल्या या जत्रेत एकूण १ हजारहून अधिक स्टॉल निशुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील खाद्य संस्कृती, ग्राम संस्कृती, कलाकृती पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आयोजकांचा मानस आहे. विद्यार्थी आणि नवोदित कलावंतरांसाठी हक्काचे व्यासपीठ असून, विजेत्या स्पर्धाकांना आकर्षक बक्षीसेही देण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *