शहरातील सोसायट्यांसह नागरिकांच्या घरोघरी जाऊन लसीकरण करावे आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन- सचिन चिखले – गटनेता मनसे

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि २ जुलै २०२१
कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत कोविड प्रतिबंधक लसीकरण वेगाने राबविण्याची गरज आहे. शहरात सध्या वेगवेगळ्या भागात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. परंतु, त्याठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेचे नियोजन कोलमडत आहे. लसीकरण नियोजनाचा पूर्णपणे फज्जा उडत असून याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे.

कोरोनाच्या तिस-या लाटेला सामोरे जात असताना आपल्याला शहरातील प्रत्येक नागरिकाला प्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे. त्यासाठी आपली यंत्रण गतीमान करून जास्तीत जास्त नागरिकांना लस टोचणे गरजेचे आहे. लसीकरण करण्यात दिरंगाई झाल्यास कोरोनाची तिसरी लाट प्रभावकारी ठरेल. त्यामुळे लसीकरण मोहीम तिव्र स्वरूपाची करावी. शहरातील सर्वच सोसायट्या, कॉलन्या, चाळीं, झोपडपट्ट्या आदी लोकवस्तीमध्ये जाऊन नागरीकांचे पूर्ण क्षमतेने लसीकरण करण्यात यावे. एकाच ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू न ठेवता लोकवस्तीमध्ये जाऊन नागरिकांना लस दिल्यास फायदेशीर ठरेल. त्यामुळे घरोघरी जाऊन कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम तीव्रपणे राबविण्यात यावी, असे आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .

Advertise


यावेळी त्यांच्यासोबत मनसे चे रुपेश पाटेकर, मयूर चिंचवडे, दत्ता देवतासे, विशाल मानकरी, सुरेश सकट, राजू भालेराव, चंद्रकांत दानवले, सुशांत साळवी, महिला शराध्यक्षा अश्विनी बांगर, अनिता पांचाळ, स्नेहल बांगर,
आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *