आळेफाटा येथे ५ मित्रांकडून १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार:चौघांना पोलिसांकडून अटक

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.2/07/2021

आळेफाटा येथे ५ मित्रांकडून १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार:चौघांना पोलिसांकडून अटक

बातमी:-विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

आळेफाटा:- पाच मित्रांचा १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच मित्रांनी दोन वर्ष सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरात घडली आहे. आळेफाटा पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार पिडीताने गुरुवारी (ता. १ ) रात्री याबाबत फिर्याद दिली. या प्रकरणी चार जणांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.
या घटनेमुळे आळेफाटा परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ओळख करून घेऊन तिचे फोटो काढत इतरांना पाठवण्याची धमकी देऊन पाच मित्रांनी गेल्या काही दिवसांपासून सामूहिक बलात्कार करत असल्याची माहिती आळेफाटा पोलिसांनी दिली आहे.

Advertise


तसेच संबधित मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत पाच मित्रांनी नगर रोडवरील एक लॉजवर १५ जून २०१९ ते १५ जून २०२१ च्या दरम्यान वेगवेगळ्या गाड्यांमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पीडितीचे तक्रारीवरून संजय पोटे (वय २८), निखील पोटे (वय २२), दयानंद टेमगिरे (वय २०) सुरज उदय तितर (वय २३), यश गाडेकर ही असून, हे सर्वजण आळेफाटा परिसरात रहात आहेत. यांच्याविरुद्ध बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चार आरोपींसह एक आलिशान वाहन ताब्यात घेतले आहे. तसेच एका आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. आळेफाटा पोलिस निरीक्षक मधुकर पवार पुढील तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *