आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रो.डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर यांची बी.डी.काळे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नुकतीच निवड झाली आहे.डॉ. वाल्हेकर हे 1 जुन 2022 पासून प्रभारी म्हणून काम करत होते. डॉ.वाल्हेकर यांचे मराठी साहित्य व भाषाविषयक आजमितीस 26 शोधनिबंध संशोधनविषयक नियतकालिकात प्रसिध्द झालेले आहे.त्यांचे आदिवासी साहित्यावरील अभ्यासपूर्वक पुस्तक पुणे,मुंबई,जळगाव येथील मराठी पदव्युत्तर वर्गासाठी संदर्भग्रंथ म्हणून लागले आहे.त्यांचे मार्गदर्शनाखाली 9 विद्यार्थ्यांनी एम.फिल.व पीएच.डी.चे संशोधन कार्य पूर्ण केले आहे.ही निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे,उपाध्यक्ष शामशेठ होनराव, सचिव अक्षय काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड.मुकुंदराव काळे, कार्याध्यक्ष राजेश काळे,न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल कमिटीचे चेअरमन बाळासाहेब काळे,सल्लागार अँड महेश काळे,नरेंद्र काळे तसेच इतर पदाधिकारी, संचालक,सल्लागार,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.