सरकारी कामगार संघटनेचे ज्येष्ठ नेते रमाकांत गणेश कर्णीक यांचे निधन…

पुणे : – (आंबेगाव ब्युरो मोसीन काठेवाडी )
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि ज्येष्ठ नेते मा.रमाकांत गणेश कर्णीक यांचे मुंबई, वांद्रे येथील निवासस्थानी दु :खत निधन झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परीचर कर्मचारी संघटनाचे कार्याध्यक्ष राजेंद्र गुळवे यांनी दिली.
ज्या काळात सोशल मिडिया नव्हता, इंटरनेट सुविधा नव्हती, हक्कांबाबत अवेरनेस कमी होता. वेतन कमी होते. शासनाची पकड वरिष्ठांचा दरारा पक्का होता. अशा परिस्थितीतही संघटनेचे सारथ्य कुशलतेने केले.वर्ग १ ते ४ सरकारी कर्मचार्‍यांच्या महत्वाच्या समस्या,
जिव्हाळ्याच्या मागण्या व समस्यां सोडविण्यासाठी अहोरात्र सरकार दरबारी प्रयत्न करणारे कर्णिक साहेब यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी आखेरचा श्वास घेतला
त्यांच्या जाण्याने सर्व सरकारी कर्मचार्‍यांचा मुळ आधारच हरपला. कर्मचार्‍यांच्या भावना,तळमळ समजून घेणारा व त्यांचे क्षणात निराकारण करणारा तळपता हीरा व कर्मचार्‍यांसाठी सरकाराकडे जाब मागणारा एक धगधगता निखारा अशी त्यांची ख्याती होती.अशा सर्वज्येष्ठ सरकारी कामगार नेत्याना आपण मुकलो आहोत. त्यांची ऊणीव कदापिही भरणे व असा सर्वकश नेता भविष्यात मिळणे शक्य नाही.कर्णिक यांच्या निधनानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे .
गट-ड(चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण तसेच कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप चैधरी,कार्याध्यक्ष राजेंद्र गुळवे तसेच सर्व पदाधिकारी, सदस्य, व संपूर्ण राज्यातील कर्मचारी परिवार या दुखात सहभागी आहे. तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचीही आठवण अनेकांनी शेअर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *