घोडेगाव येथे RTPCR चाचणी सेंटर सुरु…

घोडेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
घोडेगांव व पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने सुनिल इंदोरे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य घोडेगांव या ठिकाणी RTPCR चाचणी सेंटर चालू करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे मागणी केली होती.घोडेगाव ग्रामपंचायत तालुका पातळीवरील मोठी ग्रामपंचायत असून घोडेगाव पंचायत समिती आवारात कोरोना अँटिजेन चाचणी होत असते.

भीमाशंकर आहुपे पट्ट्यातील व घोडेगाव नारोडी गिरवली शिणोली येथून नागरिक चाचणी साठी येत असतात RTPCR चाचणी करण्यासाठी भीमाशंकर आहुपे पट्टा व घोडेगाव शिनोली परिसरातील लोकांना अवसरी येथे जावे लागते.


त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती त्यामुळे घोडेगाव येथे RTPCR चाचणी करण्यात यावी.अशी मागणी माजी उपसरपंच सुनील इंदोरे यांनी तालुका आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती,घोडेगाव पंचायत समिती आवारात RTPCR चाचणी चालू केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले