ग्रामोन्नती मंडळाचे नारायणगाव महाविद्यालय व रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांच्या संयुक्त विद्यमाने गुगल मीट द्वारे अंतरराष्ट्रीय योग दिन साजरा…

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१
जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
या योगदिनाच्या निमित्ताने काही प्राध्यापक नारायणगाव महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे, उपाप्रचार्य. होले जी . बी . वाणिज्य विभाग प्रमुख, रो. प्रा. डॉ. एस. डी. टाकळकर, छात्र सेना विभाग प्रमुख प्रा. दिलीप शिवणे. क्रीडा विभाग प्रभारी. प्रा. शरद काफले. एन. एस.एस. पुणे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. श्रीकांत फुलसुंदर, एन.एस.एस विभाग प्रमुख प्रा. स्वप्निल कांबळे रोटरी क्लब हायवेची अध्यक्ष अंबादास वामन ,रो. शामराव थोरात, प्रा. मधुरा काळभोर. प्रा. पूर्वा साने, विद्यार्थी प्रतिनिधी अश्विनी साबळे व दरेकर नम्रता दरेकर ,योगेश खरमाळे हे उपस्थित होते.

Advertise


या कार्यक्रमात प्रा. मधुरा काळभोर, प्रा. पूर्वा साने, तसेच अश्विनी साबळे आणि नम्रता दरेकर या योग शिक्षिका म्हणून लाभल्या. त्यांनी प्रत्यक्ष योगाचे प्रात्यक्षिके, विविध योगासने, योगाचे महत्व दैनंदिन योगाचे फायदे यासंबंधी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी त्याचप्रमाणे विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो. प्रा. डॉ. एस.डी.टाकळकर यांनी केले यात त्यांनी सध्या आपण एका वेगळ्या साथीच्या आजाराच्या संक्रामनातून जात आहोत.अनेक अप्रिय घटना या काळात आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत.या सर्व परिस्थिती चा सामना करण्यासाठी मानसिक व शारीरिक सुधृढता अत्यंत महत्वाची आहे.योग अभ्यास महत्वाचा आहे.तसेच आपली योग संस्कृती किती जुनी व पारंपरिक आहे हे सुद्धा सांगितले. तर प्राचार्य डॉ शेवाळे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना सर्वांना शुभ संदेश दिला यामध्ये त्यांनी शरीर सुदृढ असेल तर त्याचे आरोग्य देखील सुदृढ असते. आरोग्य सुदृढ असेल तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप सोईस्करपणे पार पडत असतात. शरीर मजबूत तर मन मजबूत. मात्र आपले आरोग्य चांगले नसेल तर आपल्या जवळ सर्व काही असूनही काही उपयोग नाही.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मधुरा काळभोर यांनी केले. प्रा. डॉ. एस.एम ‌फुलसुंदर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *