रोटरी तर्फे गरीब व गरजूंना किराणा किट व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप…

नारायणगाव : (किरण वाजगे कार्यकारी संपादक)

रोटरी क्लब नारायणगाव हायवे ,रोटरी क्लब ऑफ निगडी व रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव, आनंदवाडी, वारूळवाडी, पाबळवाडी, गडाचीवाडी येथील गरीब व गरजू परप्रांतीय मजुरांना किराणा किटचे व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष रो. अंबादास वामन यांनी दिली.


याप्रसंगी रोटरीचे मेडिकल डिस्ट्रिक झोनल डायरेक्टर रो डॉ. पंजाबराव कथे यांनी कोव्हीड मध्ये रोटरी क्लब मार्फत कोरोना कालखंडात अनेक मजुरांची उपासमार होत आहे. यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले. रोटरी क्लब ऑफ निगडी चे आय पी पी रो. काळभोर व अध्यक्ष रो . डॉ.प्रवीण घाणेगावकर यांनी आपल्या मनोगतातून गरीब गरजू मजुरांना किराणा किटचे वाटप करून आम्ही योग्य वेळी वेगवेगळ्या प्रकारची मदत व उपयोगी वस्तू गरजू गरीब लाभार्थीना देतो असल्याचे सांगितले.
यावेळी रो. बाळासाहेब गिलबिले व रो. अंबादास वामन यांनी मनोगत व्यक्त केले.

Advertise


या कार्यक्रमास रो.मुकुंद मुळे, रो.केशव मानगे,रो.अजित कोठारी ,रो.नियोग जांबुवणी रो, रविंद्र वाजगे,रो.डॉ. शिवाजी टाकळकर डॉ. श्रीकांत फुलसुंदर, ॲड.रो.राम भालेराव ,रो.नंदकुमार चिंचकर,रो.शामराव थोरात, रो. रामभाऊ सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सेक्रेटरी रो. डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांनी केले तर आभार इले.प्रेसिडेंट रो. डॉ. शिवाजी टाकळकर यांनी मानले.