आधार कार्डमध्ये तुमचा नवीन मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा, जाणून घ्या

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ ऑक्टोबर २०२२

पिंपरी


आधार आणि तुमचा मोबाईल एकमेकाला कनेक्ट असल्याने आधार वरील डेटा अपडेट करायचा असल्यास फोन सोबत असणं गरजेचं आहे. आजच्या काळात आधार कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. आधार कार्डाशिवाय आपली अनेक महत्त्वाची कामे अपूर्ण राहू शकतात.आधार कार्डाशिवाय तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.तुमचा मोबाईल नंबर नेहमी आधार कार्डशी जोडला गेला पाहिजे कारण कोणत्याही अपडेटसाठी किंवा आधारशी संबंधित कोणत्याही कामासाठी, OTP फक्त तुमच्या आधार नोंदणीकृत नंबरवर येतो.

फोन नंबर ॲानलाईन अपडेट होत नाही. त्यासाठी आधार सेंटरलाच जावं लागतं. मोबाईल नंबर अपडेट करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध नाही. जर तुमचा फोन नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला अनेक ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे असा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक करा, जो सक्रिय आहे आणि तुमच्याकडेच आहे.तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डमध्ये लिंक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्या. आधार अपडेट/ सुधारणा फॉर्म भरा. आधार कार्ड एक्झिक्युटिव्हला फॉर्म द्या. तुमचा नंबर तुमच्या बायोमेट्रिक पडताळणीसह अपडेट केला जाईल. आधार कार्डमध्ये फोन नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला ५० रुपये शुल्क भरावे लागेल. तुम्हाला आधार कार्ड केंद्राकडून पोचपावती दिली जाईल. त्यात तुमचा अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) आहे. या नंबरद्वारे तुम्ही तुमची अपडेट विनंती तपासू शकता. ९० दिवसांच्या आत आधार कार्ड डेटाबेसमध्ये मोबाइल नंबर अपडेट होईल. तसेच, तुम्ही आधार केंद्रावर जायचे असल्यास तुमच्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करू शकता.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *