पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वृक्ष संवर्धन समिती बरखास्त करून नवीन समिती स्थापन करावी-रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सरवदे यांचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि १८ जून २०२१

आम्ही आपले गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधू इच्छितो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वृक्ष संवर्धन समितीने वृक्ष संवर्धनासाठी काहीही ठोस कृती केल्याचे निदर्शनास येत नाही.महाराष्ट्र(नागरी क्षेत्र)झाडांचे रक्षण आणि जतन अधिनियमानुर कामकाज होत नसल्याचे दिसून येते वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य ना कोणत्या बैठकांना उपस्थित राहतात, ना काही सूचना करतात, ना काही तक्रारी , ना अहवाल कधी सादर केला आहे. मग वृक्ष संवर्धन समिती शोभेचे बाहुले आहे का वृक्ष गणना GIS पद्धतीने करण्याचे कामकाज अद्यापही पूर्ण झाले नाही मे. टेरेकोन इकोटेक प्रा. लि. या कंपनीस दोन वेळा दंड ठोठावून आणि मुदतवाढ देऊनही आजतागायत वृक्ष गणना पूर्ण झाली नाही ही वृक्षगणना करताना वृक्षांना वेगळा सांकेतिक नंबर किंवा एखादा टॅग लावून या झाडांचे गणनेमध्ये समावेश करणे गरजेचे होते परंतु कोणत्याही प्रकारची यंत्रणा वृक्ष गणना करताना वापरली गेली नसल्याचे उघड झाले आहे.जेणेकरून या वृक्षाचा गणनेत समावेश झाला आहे की नाही हे सहज समजले असते.याप्रकरणी वृक्षसंवर्धन समितीतील सदस्य गप्प का आहेत.

Advertise


          महाराष्ट्र ( नागरी क्षेत्र) झाडांचे जतन आणि संवर्धन अधिनियम 1975 तरतुदीचा भंग करून आपल्या पालिकेच्या कार्यक्षेत्रातील 2010 पासून आजपर्यंत किती लोकांनी झाडे तोडली बेकायदेशीररित्या तोडलेल्या झाडांची संख्या? किती? अशा लोकांना काय शिक्षा झाली? या संबंधित वृक्षसंवर्धन समितीतील सदस्यांनी कधीही आवाज न उठवल्याचे निदर्शनास येते. वृक्षसंवर्धन समितीतील सदस्यांना वृक्ष संवर्धन व जतन यातील ज्ञान आहे का की फक्त नावाला वृक्षसंवर्धन समिती स्थापन केली आहे आज पर्यंत वृक्ष संवर्धन समितीच्या किती बैठका झाल्या आहेत,त्या बैठकीत किती सदस्य हजर असतात,याचा तपशीलवार पत्राद्वारे खुलासा करावा आमच्या मागणीनुसार वृक्ष संवर्धन समिती बरखास्त करून त्याजागी नवीन वृक्षारोपण आणि जतन या विषयातील ज्ञान असलेल्या व्यक्तींना सदस्य म्हणून नेमण्यात यावे आणि तात्काळ वृक्ष गणना करण्याचे कामकाज