चालकाला डुलकी लागल्याने टेम्पोचा अपघात: चालकाचा मृत्यू

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.15/6/2021

चालकाला डुलकी लागल्याने टेम्पोचा अपघात: चालकाचा मृत्यू

बातमी:- विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

बेल्हे :- कल्याण- नगर महामार्गावर गुंजाळवाडी येथे आयशर टेम्पो चालकाला डुलकी लागल्याने टेम्पो झाडाला आदळून चालकाचा मृत्यू झाला.
गुंजाळवाडी (ता.जुन्नर) येथे भुसा भरून नगरच्या दिशेने जाणारा आयशर कंपनीचा टेम्पो (एम एच ०४ एच एस १३१०) चालकाला पहाटेच्या वेळी झोप लागल्याने टेम्पो झाडावरती जाऊन आदळला.

ही घटना मंगळवार (दि.१५) पहाटे साडेसहा वाजता घडली. त्यातच चालक उत्तम बापू शिंदे (रा.इगतपुरी जि.नाशिक) यांचा मृत्यू झाला. झाडाला आदळून टेम्पो पलटी होऊन अपघात झाल्यानंतर टेम्पोत असणाऱ्या भुसाच्या गोळ्या इतरत्र पडल्या. टेम्पोचा पुढील भाग झाडाला आदळल्यामुळे ड्रायव्हर साईड व क्लिनर बाजुचा चक्काचूर झाला होता. अपघातावेळी टेम्पोमध्ये चालक एकटाच होता.

Advertise

आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये टेम्पो मालक संजय गायकर यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे व डुलकी लागल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *