१४ नंबर येथील अनंत ग्रामीण पतसंस्थेत खिडकीतून प्रवेश करून १७ हजार ८०० रुपयांची चोरी

किरण वाजगे
कार्यकारी संपादक

२३ डिसेंबर २०२२

नारायणगाव


नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील १४ नंबर, कांदळी येथील अनंत ग्रामीण सहकारी पतसंस्थेमध्ये तीन अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे.या चोरीमध्ये पंधरा हजार रुपये रोख रक्कम व २ हजार ८०० रुपयांच्या जुन्या फाटक्या नोटा अज्ञात चोरट्यांनी लांबवल्या. याबाबतची फिर्याद अनंत पतसंस्थेचे च्या वतीने नारायणगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली.

तीन चोरटे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद

तसेच १४ नंबर येथील आर्या हॉटेल बियर बार मध्ये १२ हजार ९०० रुपयांच्या दारूच्या बाटल्या अज्ञात चोरट्यांनी लांबवल्या असून दत्तात्रय गणूजी भोर यांच्या घरातील चांदीची समई व डॉ. राजेश राजदेव यांचे मेडिकल शॉप फोडून चोरी करण्यात आली आहे.

बियर बार फोडून १२ हजार ९०० रुपयांची दारू देखील लंपास

तसेच अनंत पतसंस्थेच्या खिडकीचे गज वाकवून व आतमध्ये प्रवेश करून तीन चोरट्यांनी ही रक्कम लांबवली अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. दरम्यान याच पतसंस्थेमध्ये दीड वर्षांपूर्वी दोन जणांनी दिवसाढवळ्या येऊन पतसंस्थेच्या व्यवस्थापकावर गोळ्या घालून व त्याचा खून करून रोख रक्कम लांबवली होती. दरम्यान काही प्रसारमाध्यमांमध्ये पुन्हा एकदा अनंत पतसंस्थेवर दरोडा पडला असल्याची अफवा पसरल्याने परिसरात चर्चेला उधाण आले. सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे नारायणगाव पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *